नवी दिल्ली : देशाच्या आर्थिक प्रगतीचा लेखाजोखा मांडणारा 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७' येत्या रविवारी, १ फेब्रुवारी रोजी सादर होणार आहे. २९ जानेवारी रोजी संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणाकडे लागले आहे. रविवारी सकाळी ११ वाजता अर्थमंत्री संसदेत बजेट मांडतील. हे बजेट अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करून नवा विक्रम प्रस्थापित करणार आहेत. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प असून, आगामी वर्षात सरकारची आर्थिक धोरणे नेमकी कोणत्या दिशेने जाणार, याचा स्पष्ट आराखडा यातून समोर येईल.
मुंबई : महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी विमानांच्या आणि हेलिकॉप्टर्सच्या तातडीच्या कामांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. सरकारी हवाई ...
रविवारी अर्थसंकल्प सादर करण्याची पहिलीच वेळ...
भारतीय संसदीय लोकशाहीत यंदा एक आगळीवेगळी घटना पाहायला मिळणार आहे. साधारणपणे आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प यंदा चक्क रविवारी (१ फेब्रुवारी) मांडला जाणार आहे. भारताच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत असून, सकाळी ११ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारमण आपल्या भाषणाला सुरुवात करतील. २०१७ पर्यंत अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी मांडला जात असे. मात्र, तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही परंपरा बदलून १ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली होती. आता २०२६ मध्ये रविवारी बजेट सादर करून नवा पायंडा पडत आहे. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ आणि सामान्य नागरिकांच्या या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी सादर होणाऱ्या या बजेटकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
बजेटचं पूर्ण शेड्यूल कसं असेल?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने २८ जानेवारी २०२६ रोजी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला दिमाखात सुरुवात झाली आहे. यंदाचे हे महत्त्वाचे अधिवेशन दोन टप्प्यांत पार पडणार असून, यामध्ये केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर सविस्तर चर्चा होणार आहे. अधिवेशनाचा पहिला टप्पा २८ जानेवारीपासून सुरू झाला असून तो १३ फेब्रुवारीपर्यंत चालेल. त्यानंतर मंत्रालयांच्या खर्चाच्या मागण्या आणि अर्थसंकल्पीय घोषणांवर संसदीय समित्यांना सविस्तर अभ्यास करता यावा, यासाठी एक मोठा 'ब्रेक' दिला जाणार आहे. या अभ्यासानंतर अधिवेशनाचा दुसरा टप्पा ९ मार्च रोजी सुरू होईल आणि २ एप्रिल २०२६ रोजी अधिवेशनाची सांगता होईल. या वेळापत्रकामुळे सरकारी योजनांच्या अंमलबजावणीवर सखोल चर्चा होण्यास मदत होणार आहे.
बजेट २०२६ चं लाईव्ह आणि महत्वाचे अपडेट्स इथे पहा...
अर्थसंकल्पाच्या दिवशी नेमकी लाईव्ह माहिती कुठे मिळेल, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतो. जर तुम्हाला यंदाचं म्हणजेच बजेट २०२६ हे कुठे लाईव्ह पाहता येईल असा प्रश्न पडत असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. तसेच, अर्थमंत्र्यांच्या भाषणातील प्रत्येक मोठी घोषणा, टॅक्स स्लॅबमधील बदल आणि योजनांची सविस्तर माहिती प्रहार न्यूजलाईनच्या वेबसाईटवर आणि विश्वसनीय PrahaarNewsline डिजिटल प्लॅटफॉर्म्स उपलब्ध असेल.
प्रहार न्यूजलाईनच्या वेबसाईट : https://prahaar.in/
डिजिटल प्लॅटफॉर्म्स : https://www.instagram.com/prahaarnewsline/
बजेटची कॉपी कुठून डाऊनलोड कराल?
अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पीय भाषण पूर्ण झाल्यानंतर सरकार हे बजेट लगेचच डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देते. तुम्ही indiabudget.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन बजेट डाउनलोड करू शकता. याशिवाय, सर्व सरकारच्या ‘युनियन बजेट मोबाइल ॲप’ वर सर्व कागदपत्रं पीडीएफ स्वरूपात उपलब्ध असतील.






