मोहित सोमण: सकाळच्या सत्रात जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर व विशेषतः २ फेब्रुवारीला सादर होणारा अर्थसंकल्प पाहता गुंतवणूकदारांनी सावधगिरीचा कल बाळगला आहे. सेन्सेक्स ३१४.८३ व निफ्टी ८४.२५ अंकाने घसरला आहे. सेन्सेक्स बँक व बँक निफ्टीत निर्देशांकात घसरण झाल्याने बाजाराला आधारभूत पातळी मिळू शकली नाही. क्षेत्रीय विशेष निर्देशांकात मेटल, पीएसयु बँक, रिअल्टी, तेल व गॅस निर्देशांकात वाढ झाली असून सर्वाधिक घसरण आयटी, फार्मा, हेल्थकेअर, कंज्यूमर ड्युरेबल्स या निर्देशांकात झाली. बाजारात तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर आज गुंतवणूकदार अधिक प्रमाणात क्षेत्रीय विशेष निर्देशांकात लक्ष केंद्रित करू शकतात. दरम्यान परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार यांची बाजारातील आगामी खरेदी विक्री व रुपयांची हालचाल बाजारात केंद्रस्थानी ठरू शकते.
सकाळच्या सत्रात सर्वाधिक वाढ हिंदुस्थान कॉपर (१०.०६%), वालोर इस्टेट (६.४७%), बिर्लासॉफ्ट लिमिटेड (५.१७%), हिताची एनर्जी (४.५५%), गार्डन रीच (४.०२%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण फाईव स्टार बसेस (६.६८%), क्राफ्ट्समन ऑटो (४.५६%), मोतीलाल ओसवाल फायनान्स (३.१२%), जेपी पॉवर वेंचर (२.६५%), मारूती सुझुकी (२.४३%), रेनबो चाईल्ड (१.९८%) समभागात झाली आहे.






