Thursday, January 29, 2026

स्टार हेल्थ इन्शुरन्सचा 'घणाघाती' तिमाही निकाल कंपनीच्या नफ्यात थेट ४१४% वाढ 'या' पातळीवर शेअर उसळला

स्टार हेल्थ इन्शुरन्सचा 'घणाघाती' तिमाही निकाल कंपनीच्या नफ्यात थेट ४१४% वाढ 'या' पातळीवर शेअर उसळला

मोहित सोमण: स्टार हेल्थ इन्शुरन्स (Star Health and Allied Insurance Limited) कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला. त्यानंतर शेअर सकाळी ४% उसळला आहे. विशेषतः या विमा कंपनीने इयर ऑन इयर बेसिसवर ४१४% वाढ नोंदवल्याने बाजारात गुंतवणूकदारांनी शेअरला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. गेल्या डिसेंबर तिमाहीतील ८७ कोटी तुलनेत या तिमाहीत ४१४% वाढ झाल्याने नफा ४४९ कोटींवर पोहोचला. तर नऊ महिन्यांच्या आधारावर तिमाही बेसिसवर करोत्तर नफ्यात ८७% वाढ नोंदवली गेली आहे. विशेषतः कंपनीच्या जीडब्लूपी (Gross Written Premium) थेट २३% वाढला असून तो तिमाहीत इयर ऑन इयर बेसिसवर ४०९९ कोटीवरून ५०४७ कोटींवर पोहोचला आहे.तर निव्वळ प्रिमियम कमाईत (Net Earned Premium) इयर ऑन इयर बेसिसवर १२% वाढ झाली ज्यामध्ये ती ३८०० वरून ४२५० कोटींवर पोहोचली. मात्र कंपनीच्या खर्चातही इयर ऑन इयर बेसिसवर ११% वाढ झाली. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ११५१ कोटी तुलनेत १२८० कोटींवर वाढ झाली आहे. तर उपलब्ध माहितीनुसार, कंपनीच्या गुंतवणूकीतून झालेल्या कमाईत (Investment Income) १७६% वाढ झाली आहे जी २०६ वरून ५६९ कोटींवर वाढ नोंदवली आहे.

कंपनीने तिमाहीत दिलेल्या निकालानुसार, क्लेम सेटलमेंट रेशो (गुणोत्तर) मात्र ३% घसरण झाली. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ७१.८% तुलनेत ६८.८% पातळीवर घसरण झाली. तसेच खर्चाचे गुणोत्तर (Expenses Ratio) इयर ऑन इयर बेसिसवर ०.२% घसरत ३०.३% वरून ३०.१% घसरले.कंपनीने स्टार हेल्थने आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या ९ महिन्यांत ८९०० कोटी रुपयांच्या २ दशलक्षाहून अधिक दाव्यांची पूर्तता केली आहे.आर्थिक वर्ष २६ च्या पहिल्या ९ महिन्यांत नूतनीकरणाचा कल मजबूत होता ज्यामध्ये ९९.२% पॉलिसींचे नूतनीकरण झाले.कंपनी-स्तरीय एनपीएस (NPS) डिसेंबर २०२४ मधील ५५ वरून डिसेंबर २०२५ मध्ये ६४ पर्यंत सुधारला.

दाव्यांशी संबंधित (Claim Related) एनपीएस (NPS) डिसेंबर २०२४ मधील ६३ वरून डिसेंबर २०२५ मध्ये ६४ पर्यंत सुधारला असे आर्थिक निकालाबाबत मत व्यक्त करताना म्हटले असून पुढे डिजिटल तंत्रज्ञान आता संपूर्ण मूल्य साखळीमध्ये (Total Supply Chain) समाविष्ट केले गेले आहे ज्यामुळे ग्राहकांचा अनुभव सुधारला आहे आणि ऑपरेटिंग लिव्हरेज तयार झाले आहे. नवीन रिटेल विक्रीच्या बाबतीत, डिजिटल चॅनलने या आर्थिक वर्षात २०% योगदान दिले आहे असे म्हटले. तसेच सर्व चॅनलवरील एकूण प्रीमियमपैकी ७६% प्रीमियम डिजिटल मार्गाने गोळा करण्यात आला. तिसऱ्या तिमाहीत, आमच्या 'ॲटम' या वितरण ॲपने ८५% नवीन पॉलिसी डिजिटल पद्धतीने मिळवण्यास मदत केली जे डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता स्वीकार दर्शवते असे कंपनीने यावेळी स्पष्ट केले.

आर्थिक निकषावर बोलताना तंत्रज्ञान आधारित निष्कर्षावर बोलताना कंपनीने दावा व्यवस्थापनाच्या बाबतीत आमचे आर्टिफिशियल इंटेलिजन्स सक्षम क्लेम इंजिन सातत्याने विस्तारत आहे आणि त्याने ५७% दाव्यांचे स्थलांतर सक्षम केले आहे. यामुळे उत्पादकता पातळी वाढली आहे, ज्यामुळे ग्राहकांकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत असल्याचे म्हटले.

एकूणच कंपनीच्या कामगिरीवर भाष्य करताना, स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक आनंद रॉय म्हणाले आहेत की,स्टार हेल्थ रिटेल हेल्थ क्षेत्रात नेतृत्व कायम राखण्यावर आणि शिस्तबद्ध अंमलबजावणी व शाश्वत,आरओई (Return on Capital Employed ROE) आधारित परिणामांवर भर देऊन एक टिकाऊ, मूल्यवर्धक फ्रँचायझी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. पोर्टफोलिओचे पुनर्संरेखन (Restructuring), शिस्तबद्ध अंडररायटिंग (Displine Underwriting), विवेकपूर्ण खर्च व्यवस्थापन आणि तंत्रज्ञान आधारित वितरण या दिशेने केलेल्या आमच्या कृतींमुळे एक मजबूत ऑपरेटिंग प्रोफाइल तयार होत आहे, जे लॉस रेशो, खर्च रेशो आणि ग्राहकांच्या अनुभवातील सुधारणांमधून दिसून येते. ऑपरेटिंग घटकांसोबतच, आम्ही ९.६% चा चांगला गुंतवणूक परतावा नोंदवला आहे जो मूल्यनिर्मितीसाठी आमच्या सक्रिय भूमिकेला अधोरेखित करतो.आमचे रिपोर्टिंग आयएफआरएस (IFRS) जागतिक वित्तीय अहवाल मानकाशी (Standards) संरेखित करून, आम्ही पारदर्शकता आणि तुलनात्मकता वाढवत आहोत आणि २०२७ मध्ये या प्रणालीकडे होणाऱ्या उद्योगाच्या संक्रमणासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत.

आम्हाला वाढीस पूरक असलेल्या व्यापक आर्थिक आणि धोरणात्मक वातावरणाने प्रोत्साहन मिळाले आहे आणि भारतातील सर्वात मोठी आरोग्य विमा कंपनी म्हणून आम्ही २०४७ पर्यंत 'सर्वांसाठी विमा' हे राष्ट्रीय उद्दिष्ट साकार करण्यासाठी वचनबद्ध आहोत.' असे यावेळी म्हटले.कंपनीच्या शेअर्समध्ये सकाळी १०.४१ वाजेपर्यंत २.७१% वाढ झाली असून शेअर ४५२.५० रूपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या ५ दिवसात शेअर्समध्ये ३.२६% वाढ झाली असून महिन्यात २.४५% वाढ झाली असून संपूर्ण वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये ३.१७% वाढ झाली आहे. तर इयर टू डेट (YTD) बेसिसवर शेअर्समध्ये मात्र २.६३% घसरण झाली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >