मुंबई : आर्थर रोड कारागृह हे देशातील सर्वाधिक सुरक्षित कारागृहांपैकी एक म्हणून ओळखले जाते. याच कारागृहात पाकिस्तानी अतिरेकी अजमल कसाबला ठेवले होते. पण ताज्या घटनेमुळे हे कारागृह खरंच एवढे सुरक्षित आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. ताज्या वृत्तानुसार मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात कैद्याने पोलिसावर हल्ला केला आहे.
लोकेंद्र उदयसिंग रावत हा कैदी मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात शिक्षा भोगत आहे. याच कैद्याने जेलच्या मुख्य दाराजवळ मोकळ्या जागेत कर्तव्यावर असलेल्या अर्थात ड्युटी करत असलेल्या पोलिसांकडे बघत शिव्या देण्यास सुरुवात केली. वाघ नावाच्या पोलीस शिपायाने लोकेंद्रला गप्प बसण्यासाठी दरडावून बघितले तर लोकेंद्रने वाघ यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस शिपाई वाघ गंभीर जखमी झाले.
कैदी लोकेंद्र उदयसिंग रावत हा पोलीस शिपाई वाघ यांच्यावर हल्ला करत असल्याचे बघून इतर पोलीस घटनास्थळी धावले, त्यांनी लोकेंद्रला चोप दिला आणि ताळ्यावर आणले. यानंतर कैदी लोकेंद्र उदयसिंग रावत याच्या विरोधात पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणण्याबाबतचा गुन्हा नोंदवला. जखमी झालेल्या पोलीस शिपाई वाघ यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण ताज्या घटनेमुळे मुंबईचे आर्थर रोड कारागृह आता सुरक्षित आहे का ? असा प्रश्न उपस्थित झा