मुंबई : वरळीत मुंबईच्या कोस्टल रोडवर लवकरच हेलिपॅडची सुविधा उभारण्यात येणार आहे. हेलिकॉप्टर लँडिंगसाठी राजभवन, महालक्ष्मी रेसकोर्स आणि आता कोस्टल रोड हा एक नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे.
वरळी येथे उभारण्यात आलेल्या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक हेलिपॅडचे संचालन आणि देखभालसाठी महापालिकेने कंत्राटदार नेमण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्यासाठी २ फेब्रुवारीपर्यंत निविदा सादर केली जाणार आहे.
वरळीमध्ये समुद्रात १०० मीटर अंतरावर असलेल्या जेट्टीवर हे अत्याधुनिक हेलिपॅड उभारण्यात येणार आहे. हे हेलिपॅड दक्षिण मुंबईतील पहिलेच सरकारी मालकीचे सार्वजनिक हेलिपॅड असणार आहे.
हेलिपॅड चालवण्याचे कंत्राट सुरवातीला पाच वर्षांच्या कालावधीसाठी दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कंत्राटदाराने पालिकेला ठराविक मासिक परवाना शुल्क आणि प्रत्येक लँडिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही हिस्सा द्यावा लागेल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.
हेलिपॅडचे वैशिठ्ये
या हेलिपॅड चे वैशिष्ठ्ये म्हणजे, आपत्कालीन काळात रुग्णांना तातडीने रुग्णालयात नेण्यासाठी या हेलिपॅडचा वापर प्राधान्याने केला जाणार आहे. तसेच किनारपट्टीची सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापनेसाठी कोस्टल पोलीस व सुरक्षा दलांना हे केंद्र फायदेशीर ठरणार आहे. सरकारी तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठी देखील याचा फायदा होणार आहे.






