मोहित सोमण: हिंदुस्थान कॉपर (Hindustan Copper) शेअर आज थेट २०% उसळला आहे. दुपारी २.४४ वाजता शेअर ७६०.०५ रूपयांवर व्यवहार करत होता. आज ही झालेली मोठी वाढ असून हा शेअर सर्वाधिक उच्चांकी पातळीवर (All time High) पोहोचला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये १९२% वाढ झाली असून आज शेअरने 'बंपर' कामगिरी केल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण काही प्रमाणात शाबूत राहिले. जागतिक अस्थिरतेत तांब्यात (Copper) मध्ये अत्यंत मोठ्या संख्येने जागतिक पातळीवर वाढ होत आहे. सातत्याने मेटल शेअर्समध्ये वाढ होत असताना या धातूत मोठी मागणी निर्माण झाल्याने तांब्याला महत्व प्राप्त झाले. असे असताना ईव्ही, अक्षय उर्जा, एआय, व विविध तांत्रिक व औद्योगिक उत्पादनात तांब्याच्या मागणीमुळे गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात हिंदुस्थान कॉपर शेअरला पाठिंबा दिला आहे. सत्राच्या सुरुवातीलाच शेअर १६% उसळत नव्या पातळीवर शेअर पोहोचला होता.
त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक उच्चांकी पातळी (All time High) वर वाढ झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार सत्रादरम्यान, हिंदुस्तान कॉपरच्या शेअर्सने ७६०.०५ रुपयांची दिवसातील उच्चांकी पातळी आणि ६६२ रुपयांची नीचांकी पातळी गाठली, ज्यामुळे ५२ आठवड्यांचा आणि सर्वकालीन उच्चांक आज नोंदवला गेला. कंपनीचे सध्याचे बाजार बाजार भांडवल (Market Capitalisation) आता अंदाजे ७३०.६ अब्ज रुपये झाले आहे.
ब्रोकरेज तज्ञांच्या मते, 'हा स्टॉक सध्या सुमारे १२८ पट प्राइस-टू-अर्निंग्स (P/E) गुणोत्तरावर व्यवहार करत आहे, ज्याचा प्रति शेअर उत्पन्न (Earning per share EPS) ५.९ रुपये आहे. तांत्रिकदृष्ट्या, ही तेजी सुस्थितीत असल्याचे दिसते. ५०-दिवसांची मूव्हिंग ॲव्हरेज ४४८.६४ रुपयांवर आहे,तर २०० दिवसांची मूव्हिंग ॲव्हरेज त्याहून खूपच कमी म्हणजे ३१७.०८ रुपयांवर आहे. ५२-आठवड्यांची नीचांकी पातळी १८३.८२ रुपये होती, ज्यामुळे अलीकडील वाढ अधिकच लक्षणीय ठरते. कंपनीने १५.७३% रिटर्न ऑन इक्विटी (ROE) ३९.०६% निव्वळ विक्री वाढ आणि २६.४१% ऑपरेटिंग नफ्यात वाढ नोंदवली आहे.'
गेल्या ५ दिवसांपासून कंपनीच्या शेअर्समध्ये ३९.४०% वाढ झाली आहे तर महिन्यात ५५.९२%, वर्षभरात २३२.७४% वाढ झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) कंपनीच्या शेअर्समध्ये ४५.७२% वाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये खरेदी विक्रीत वाढ केल्याने मोठ्या व्हॉल्यूमवर या शेअरचा व्यापार बाजारात झाल्याचे स्पष्ट झाले होते.






