काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज, गुरुवारी (२९ जानेवारी) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या तक्रारींचे निवारण केले. तसेच केरळ विधानसभा निवडणुकीपूर्वी आमच्यात सर्वकाही अलबेल असल्याचेही त्यांनी सांगितले.
आम्ही एकत्र वाटचाल करत आहोत :
संसद भवन संकुलातील खरगे यांच्या दालनात झालेली ही बैठक तब्बल १ तास ४५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ चालली. या भेटीविषयी बोलताना शशी थरूर म्हणाले की; " राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत माझी चर्चा झाली. आमची चर्चा खूप चांगली, रचनात्मक, आणि सकारात्मक झाली, पुढे बोलताना त्यांनी सांगितले की; आमच्यात सर्व काही अलबेल आहे आणि आम्ही एकत्र वाटचाल करत आहोत. मी आणखी काय सांगू."
Thanks to @INCIndia President @kharge ji and LS LoP @RahulGandhi ji for a warm and constructive discussion today on a wide range of subjects. We are all on the same page as we move forward in the service of the people of India. pic.twitter.com/T5l8jqkhUT
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) January 29, 2026
यावेळी पत्रकारांनी केरळ निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर चर्चा झाली का, असे विचारले असता थरूर म्हणाले, "तो मुद्दा कधीच नव्हता. मला कोणत्याही गोष्टीचा उमेदवार होण्यात रस नाही. सध्या मी खासदार आहे, तिरुवनंतपुरममधील माझ्या मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे. संसदेत त्यांचे हित जपण्याचे काम मला करावे लागेल, तेच माझे काम आहे."
View this post on Instagram
केरळमधील पक्ष नेत्यांनी थरूर यांना बाजूला केल्याच्या कथित घटनेमुळे थरूर नाराज होते अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. तसेच भारत-पाकिस्तान संबंध आणि राजनैतिक संपर्काबद्दलच्या त्यांच्या टिप्पण्यांवरून आणि यापूर्वी झालेल्या मतभेदांमुळेही तणाव निर्माण झाला होता.






