बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावरील एक तेजस्वी तारा निखळला असून, संपूर्ण राज्य आज पोरकं झाल्याची भावना व्यक्त होत आहे. बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर सध्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार सुरू असून, आपल्या लाडक्या नेत्याला अखेरची मानवंदना देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळला आहे. देशातील दिग्गज नेत्यांनी पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली, मात्र खऱ्या अर्थाने मन हेलावले ते दादांसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना पाहून.
View this post on Instagram
'अजितदादा आता आपल्यात नाहीत' या कल्पनेनेच कार्यकर्त्यांचा संयम सुटला असून, अनेकांनी धाय मोकलून रडत आपल्या भावनांना वाट करून दिली. मैदानावरील ही अलोट गर्दी आणि लोकांच्या डोळ्यांतील अश्रू हे अजित पवारांच्या अफाट कर्तृत्वाची आणि जनमानसातील त्यांच्या स्थानाची जिवंत साक्ष देत आहेत. एक शिस्तप्रिय प्रशासक आणि प्रचंड हुशार लोकनेता कायमचा शांत झाल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.






