Thursday, January 29, 2026

भारती एअरटेलकडून ३६ कोटी भारतीयांना Adobe Express Premium मोफत सबस्क्रिप्शन देण्याची घोषणा

भारती एअरटेलकडून ३६ कोटी भारतीयांना Adobe Express Premium मोफत सबस्क्रिप्शन देण्याची घोषणा

मोहित सोमण: एअरटेलने भारतीय ग्राहकांसाठी मोठे गिफ्ट आज घोषित केले. क्रमांक २ ची दूरसंचार कंपनी असलेल्या भारती एअरटेलने इंटिग्रेटेड सर्विसेस घोषित करत Adobe Express ॲपचे सबस्क्रिप्शन मोफत देण्याची घोषणा आज एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीत केली आहे. याचा फायदा भारतातील आपल्या ३६ कोटी ग्राहकांना मिळणार असल्याचे कंपनीने आज म्हटले आहे. कंपनीने याविषयी माहिती देताना,' ही ऐतिहासिक आणि अशा प्रकारची पहिली भागीदारी सर्व एअरटेल ग्राहकांना उच्च-गुणवत्तेचे सोशल मीडियासाठीचे साहित्य, विपणन (Marketing) सामग्री, छोटे व्हिडिओ आणि त्यांना जे काही डिझाइन करायचे आहे ते जलद आणि सहजपणे तयार करण्यासाठी Adobe Express Premium चा प्रवेश प्रदान करेल. माहितीनुसार, सुमारे ४००० रुपयाचे Adobe Express Premium आता एका वर्षासाठी मोफत उपलब्ध असल्याने सर्व एअरटेल ग्राहकांना याचा लाभ घेता येईल.

मिळालेल्या माहितीनुसार, Adobe Express Premium सबस्क्रिप्शन सर्व एअरटेल ग्राहकांसाठी ज्यात मोबाइल, वायफाय आणि डीटीएच ग्राहकांसाठी उपलब्ध असेल. ग्राहक क्रेडिट कार्डची आवश्यकता नसताना एअरटेल थँक्स ॲपवर लॉग इन करून या सबस्क्रिप्शनचा लाभ घेऊ शकतात असे कंपनीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

एकूणच या घोषणेमुळे ग्राहकांच्या क्रिएटीविटीला चालना मिळू शकते. या भागीदारीबद्दल भाष्य करताना सीईओ कनेक्टेड होम्स आणि संचालक मार्केटिंग भारती एअरटेल सिद्धार्थ शर्मा म्हणाले आहेत की, 'ही भागीदारी केवळ तंत्रज्ञानापेक्षा अधिक आहे. हे लाखो भारतीयांना अत्याधुनिक एआय साधनांसह निर्मिती आणि नावीन्य आणण्यासाठी सक्षम करण्याबद्दल आहे. पहिला बायोडाटा तयार करणाऱ्या विद्यार्थ्यापासून ते पोस्टर डिझाइन करणाऱ्या लहान व्यवसाय मालकापर्यंत किंवा फॉलोअर्ससाठी व्हिडिओ संपादित करणाऱ्या क्रिएटरपर्यंत आम्ही प्रत्येक एअरटेल ग्राहकाला आत्म अभिव्यक्तीसाठी साधनांसह सक्षम करू इच्छितो. Adobe Express सह जागतिक दर्जाची सर्जनशील साधने आता चैनीची वस्तू राहिलेली नाहीत ती प्रत्येक भारतीयासाठी एक वास्तव आहेत.

याविषयी बोलताना,'आम्ही Adobe Express जलद आणि सोपे, काहीही तयार करता येणारे ॲप वापरून प्रत्येकाला निर्मिती करण्यासाठी आणि वेगळे दिसण्यासाठी सक्षम करण्यास वचनबद्ध आहोत 'असे Adobe चे डिजिटल मीडियाचे अध्यक्ष डेव्हिड वाधवानी म्हणाले आहेत. पुढे आम्ही एअरटेलसोबत भागीदारी करून Adobe Express Premium भारतातील लाखो लोकांपर्यंत मोफत पोहोचवण्यासाठी उत्सुक आहोत, ज्यामुळे भारताच्या दोलायमान क्रिएटर इकॉनॉमीच्या वाढीला गती मिळेल आणि लोकांना सहजपणे उत्कृष्ट सामग्री तयार करण्यास सक्षम करेल मग ते त्यांची करिअर वाढवणे असो, व्यवसाय वाढवणे असो किंवा त्यांच्या आवडींना प्रोत्साहन देणे असो' असे त्यांनी म्हटले आहे.

Adobe Express Premium लोकांच्या हातात Adobe मधील सर्वोत्तम गोष्टी देते.या सबस्क्रिप्शनमुळे हजारो व्यावसायिक डिझाइन टेम्प्लेट्सचा ॲक्सेस मिळतो ज्यात भारतीय सण, विवाहसोहळे आणि स्थानिक व्यवसायांसाठी तयार केलेल्या टेम्प्लेट्सचा समावेश आहे सोबतच इन्स्टंट बॅकग्राउंड रिमूव्हल, कस्टम इमेज निर्मिती आणि वन-टॅप व्हिडिओ एडिटिंग यांसारखी आर्टिफिशियल इंटेलिजन्स शक्तीवर आधारित वैशिष्ट्ये, प्रीमियम Adobe Stock ॲसेट्स, ३०००० पेक्षा जास्त व्यावसायिक फॉन्ट्स, १०० जीबी क्लाउड स्टोरेज आणि ऑटो कॅप्शन, इन्स्टंट रिसाईज यांसारखी प्रगत वैशिष्ट्ये मिळतात हे सर्व कोणत्याही वॉटरमार्कशिवाय आणि डिव्हाइसेसवर अखंड सिंकसह उपलब्ध आहे. Adobe Express इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि बंगाली भाषांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना त्यांच्या मातृभाषेत  वापरण्याची सोय मिळते. सणा सुदीच्या शुभेच्छा कार्ड्स, लग्नाची आमंत्रणे किंवा स्थानिक दुकानांसाठी प्रचारात्मक सामग्री किंवा WhatsApp स्टेटस अपडेट्स तयार करायचे असोत Adobe Express प्रत्येकासाठी उत्कृष्ट सामग्री तयार करणे सुलभ करते असे कंपनीने म्हटले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >