Thursday, January 29, 2026

वसई-विरार पालिकेत भाजप गटनेतेपदी अशोक शेळके

वसई-विरार पालिकेत भाजप गटनेतेपदी अशोक शेळके

विरार  : वसई-विरार महापालिकेत भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी अशोक शेळके यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. भाजपच्या ४३ नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत अशोक शेळके यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने ४३ जागा जिंकल्या असून, वसई-विरार महापालिकेत प्रथमच दमदार विरोधी पक्ष म्हणून भाजपचा उदय झाला आहे. भाजपचे गटनेते अशोक शेळके यांनी भाजप युवा मोर्चाच्या चिटणीस पदावर कार्य करताना अनेक आक्रमक आंदोलने केली. तसेच विविध नागरी समस्यांना वाचा फोडून त्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. तरुण, अभ्यासू आणि आक्रमक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. प्रभाग क्र. २२ मधून अशोक शेळके यांच्यासह भाजपाचे संपूर्ण पॅनल विजयी झाले आहे भाजपचे खासदार हेमंत सवरा, संघटन मंत्री हेमंत म्हात्रे, आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे, पंडित जिल्हाध्यक्ष प्रज्ञा पाटील, माजी जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, महामंत्री मनोज बारोट, जोगेंद्रसाद चौबे, विजेंद्र कुमार यांच्या उपस्थितीत नालासोपारा येथे नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीत गटनेतेपदाची एकमताने निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अशोक शेळके यांची निवड झाली. अशी माहिती भाजप वसई-विरार जिल्हा महामंत्री मनोज बारोट यांनी दिली आहे.

Comments
Add Comment