मोहित सोमण: सुरुवातीच्या कलात सावधगिरीचा फटका बसल्याने गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटीचे नुकसान झाले. मात्र पुन्हा एकदा संसदेत आर्थिक सर्वेक्षण सादर करताना ईयु एफटीएनंतर आता युएस भारत यांच्यातील संभाव्य कराराच्या बातम्यानंतर शेअर बाजारात सरतेशेवटी शेअर बाजारात सकारात्मक प्रतिसाद दिला. परिणामी इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात वाढ झाल्याने अखेरच्या सत्रात सेन्सेक्स २२१.६९ अंकाने उसळत ८२५६६.३७ व निफ्टी ७६.१० अंकाने उसळत २५४१८.९ पातळीवर स्थिरावला आहे. प्रामुख्याने बँक निर्देशांकाने सकाळच्या घसरणीला मजबूत फंडामेंटल व तिमाही निकालानंतर तेजीत बदलल्याने बाजाराला सपोर्ट लेवल अंतिम क्षणी मिळण्यास मदत झाल्याने शेअर बाजारात रिकवरी मोड मिळण्यास मदत झाली. दुसरीकडे व्यापक निर्देशांकात मिडकॅप व स्मॉलकॅप सकाळी घसरलेले मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्येही गुंतवणूकदारांनी खरेदी वाढल्याने तेजीचे संकेत अंतिमतः मिळाले. सकाळी ६% पेक्षा अधिक उसळलेला अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा अखेरच्या क्षणी १.४०% कोसळला ज्याचा फायदा बाजारात दिसत आहे. दुसरीकडे निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात मेटल, रिअल्टी, तेल व गॅस, प्रायव्हेट बँक, मिड स्मॉल फायनांशियल सर्विसेस या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली होती तर सर्वाधिक घसरण हेल्थकेअर, एफएमसीजी, आयटी, फार्मा, पीएसयु बँक निर्देशांकात झाली.
अर्थातच दिवसभरात तेजी व मंदीचे संमिश्र सूर असले तरी जागतिक अस्थिरतेचा फटका क्षेत्रीय मजबूतीने ओझरला असताना आणखी आगामी काळातील अर्थसंकल्प बाजारात नवी दिशा देऊ शकतो. आज शेअर बाजारासह कमकुवत डॉलरमुळे कमोडिटी बाजारासह कच्च्या तेलाच्या निर्देशांकात मोठी वाढ झाली ज्यामध्ये आजही परदेशी गुंतवणूकदारांनी आपली विक्री वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. दुसरीकडे घरगुती गुंतवणूकदारांनी आज आपल्या गुंतवणूकीत नफा बुकिंगसाठी वाढ केले असल्याने बाजार हिरव्या रंगात बंद झाला आहे. अखेरच्या सत्रात आशियाई बाजारात तैवान वेटेड, जकार्ता कंपोझिट, सेट कंपोझिट निर्देशांकात वगळता उर्वरित निर्देशांकात वाढ झाली असून सर्वाधिक वाढ कोसपी, गिफ्ट निफ्टी, स्ट्रेट टाईम्स निर्देशांकात झाली आहे. युएस बाजारातील सुरूवातीच्या कलात डाऊ जोन्स, नासडाक कंपोझिट निर्देशांकात वाढ झाली असून केवळ एस अँड पी ५०० निर्देशांकात अगदी किरकोळ घसरण झाली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ हिंदुस्थान कॉपर (२०%), जीएमडीसी (१०.०७%), जीई व्हर्नोवा (८.७१%), एबीबी (८.५४%), एमआरपीएल (७.९१%), जिलेट इंडिया (५.५०%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण फाईव स्टार बसेस (११.५२%), केपीआर मिल्स (६.८५%), जेपी पॉवर वेंचर (६%), कॅनरा बँक (४.७१%), एशियन पेंटस (३.८१%), टीबीओ टेक (३.२३%) समभागात झाली आहे.






