Thursday, January 29, 2026

Ajit Pawar Passed Away : 'शरद पवारांचा आधारवड गेला..'; राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

Ajit Pawar Passed Away : 'शरद पवारांचा आधारवड गेला..'; राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच गुरुवारी (दि. २९ जानेवारी) त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात आपल्या लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर लोटला आहे. यावेळी कार्यकर्त्यांकडून "परत या, परत या ... अजितदादा परत या", "थांबा! आमच्या दादांना नेऊ नका, आम्ही पाया पडतो" अशा शब्दांमध्ये आक्रोश सुरू आहे.  संपूर्ण वातावरणात शोककळा पसरली आहे. कार्यकर्त्यांसह अनेक मान्यवरांना सर्वांना आपले अश्रू थांबवून ठेवणं कठीण झालं आहे.
यावेळी राज्य आणि देशातील बडे नेते देखील बारामतीत उपस्थित आहेत. काहीवेळापूर्वीच मनसेप्रमुख राज ठाकरे हे बारामती येथील विद्या प्रतिष्ठानमध्ये दाखल झाले. राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि बाळा नांदगावकर बारामतीत उपस्थित आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांचे जाणे हा शरद पवार यांच्यावरील मोठा आघात आहे. शरद पवारांचा आधारवड गेला त्यामुळे त्यांना आधार द्यायला राज ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेते बारामतीत पोहोचले आहेत. राज ठाकरे याठिकाणी आले तेव्हा ते शरद पवार यांच्याजवळ गेले. दोघांनीही एकमेकांना नमस्कार केला. एवढ्या दु:खात असतानाही शरद पवार यांनी राज ठाकरे यांना पाठीमागे बसण्याची व्यवस्था असल्याचे सांगितले. राज ठाकरे यांनीही शरद पवार यांना तुम्ही बसा असे सांगितले.
अजित पवार यांना शासकीय इतमामात निरोप दिला जाणार आहे. अजित पवार यांच्या काटेवाडी येथील घरातून त्यांची अंत्ययात्रा निघाली आहे. या अंत्ययात्रेला प्रचंड मोठी गर्दी आहे.  अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीमध्ये सध्या शोकाकुल वातावरण आहे. येथील सर्व बाजारपेठा आणि दैनंदिन व्यवहार आज बंद ठेवण्यात आले आहेत.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा