महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धडाडीच्या आणि शिस्तप्रिय पर्वाचा आज बारामतीच्या मातीत शेवट झाला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे सुपुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी जड अंतःकरणाने आपल्या वडिलांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला, तेव्हा उपस्थितांचा काळजाचा ठोका चुकला आणि संपूर्ण विद्या प्रतिष्ठान परिसर शोकसागरात बुडाला.
याच पार्श्वभूमीवर राज्यातील जनता सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. अशातच अजित दादांच्या आठवणींना उजाळा देणारा एक जूना व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. अजित पवार हे दिलखुलास व्यक्तिमत्व होतं. ते अनेकदा जाहिर सभांमध्ये आपल्याच कार्यकर्त्यांची सुद्धा फिरकी घ्यायचे. अशाच एका सभेतील हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये ते रोहित पवारांपासून ते थेट जयंत पाटील यांच्यापर्यंत सर्वांनाच रोस्ट करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram
View this post on Instagram






