मुंबई : विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह मृत्युमुखी पडलेल्या पिंकी माळी हिचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी काही काळ तिच्या सासरी कळवा येथे आणण्यात आले होते. त्यानंतर तिचे पार्थिव पुन्हा माहेरी वरळी येथे रवाना करण्यात आले.
दुर्दैवाची बाब म्हणजे पिंकी माळी हिचे अवघ्या अडीच ते तीन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. तिच्या आवडीनिवडीनुसार तिचा पती ओम कळवा येथील राहत्या घरी फर्निचर बनवत होता. तिच्या आवडत्या रंगांपासून घराची सजावट सुरू होती. सोसायटीतील प्रत्येक सण-उत्सवामध्ये हे दोन्ही जोडपे सक्रिय सहभाग घेत असत.
नुकताच पिंकीचा वाढदिवस संपूर्ण सोसायटीसोबत कुटुंबीयांनी साजरा केला होता. इतकेच नव्हे तर दोन्ही कुटुंबे सोसायटीतील सर्वांसोबत अतिशय आपुलकीने, मिळून-मिसळून राहायची. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.