नाशिकच्या विकासाशी नाळ जुळलेला नेता

नाशिक जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर १ राहण्यामागे देखील अजित दादा पवार यांचे मोठे योगदान राहिले आहे. भगूर नगर परिषदेवर २५ ते ३० वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षांची सत्ता आली. भगूर येथील अजित दादांच्या सभेने नगर परिषद निवडणुकीचे वातावरण राष्ट्रवादीच्या बाजूने झुकले.

 

नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेती, धरणे तसेच विविध विकासकामे मार्गी लावण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सिंहाचा वाटा होता. विशेषतः सिन्नर तालुक्यातील गारगाई-देव नदी जोड प्रकल्पाला त्यांनी प्रशासकीय मान्यता मिळवून दिली. त्यामुळे हा राज्यातील एका तालुक्यासाठी असलेला एकमेव प्रकल्प ठरला आहे. नांदूर मधमेश्वर धरणाला गेट बसवण्यासाठी दिलेले योगदान, जिल्ह्यातील एकमेव सहकारी तत्त्वावर सुरू असलेल्या कादवा साखर कारखान्याला मिळालेले पाठबळ, तसेच दिंडोरीतील वळण योजना ही आज शेतकऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली निधनाने नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र एका प्रगल्भ नेतृत्वाला मुकला आहे. सन १९८४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील १४ पैकी १३ जागांवर पुलोदचे आमदार निवडून देत नाशिककरांनी शरद पवार यांना भक्कम साथ दिली होती. त्यानंतर १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतरही ग्रामीण जनतेने पक्षाला भरभरून पाठिंबा दिला. २०२२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही नाशिककरांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत ग्रामीण भागातील ११ पैकी सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून दिले.
ग्रामीण भागाची तळमळ असलेले नेते म्हणून अजित पवार यांची ओळख होती. नाशिकचे लोकप्रतिनिधी कोणतीही समस्या किंवा प्रश्न घेऊन गेले असता, काही अपवाद वगळता ते प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहत नसत. सिन्नर तालुक्यातील गारगाई-देव नदी जोड प्रकल्पासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न केले, तर प्रशासकीय मान्यतेसाठी आमदार माणिक कोकाटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अजित पवार यांच्या निर्णायक भूमिकेमुळे हा प्रकल्प मंजूर झाला असून, दुष्काळ हटविण्यासाठी तो मोलाचा ठरणार आहे. नांदूर मधमेश्वर धरण परिसरात गाळ साचल्यामुळे पाणी शेतीपर्यंत पोहोचत नव्हते, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. या धरणाला गेट बसवण्यासाठी आमदार दिलीप बनकर यांनी पाठपुरावा केला. अजित पवार यांनी त्यांना भक्कम साथ दिल्याने हा प्रकल्प पूर्ण झाला आणि परिसरातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले. निफाडसह इतर अनेक साखर कारखाने चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत आले. मात्र जिल्ह्यातील एकमेव सहकारी तत्त्वावर चालणारा कादवा सहकारी साखर कारखाना अजित पवार यांच्या मदतीमुळे आजही चांगल्या स्थितीत आहे. या कारखान्याचे दीर्घकाळ चेअरमन असलेले श्रीराम शेटे यांना शरद पवार यांच्यासह अजित पवार यांचे मोठे पाठबळ लाभले.
पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवण्यासाठी दिंडोरी तालुक्यातील वळण योजना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तत्कालीन उपाध्यक्ष तथा मंत्री नरहरी झिरवळ यांच्या माध्यमातून अजित पवार यांनी यशस्वीपणे मार्गी लावला. त्यामुळे नद्यांमध्ये पाणी वाहू लागले आणि सिंचनाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटला. नाशिकच्या शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेली जिल्हा बँक डबघाईस आली. त्यामुळे अल्प, मध्यम व अल्पभूधारक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आले. या बँकेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी राज्य शासनाने हरप्रकारे प्रयत्न केले. परंतु कर्ज वसुली प्रमाणात न झाल्यामुळे बँकेला ऊर्जितावस्था येत नव्हती. बँकेची स्थिती सुधारावी यासाठी अजित दादांनी विशेष पॅकेज देखील जाहीर केले. पवार यांच्या प्रयत्नाने सहकार तज्ज्ञ विद्याधर अनासकर यांना जिल्हा बँकेच्या सल्लागार पदी नियुक्ती केली. परिणामी बँकेची वसुली देखील आता काही प्रमाणात पुढे सरकली असून भाग भांडवल निधीच्या आधारे बँक पुन्हा जिवंत होईल अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून उपस्थित केली जात आहे. जिल्हा बँकेच्या मदतीमुळे त्यांची कृषी आणि सहकार क्षेत्राविषयी आस्था दिसून येते. नाशिक जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर १ राहण्यामागे देखील अजित दादा पवार यांचे मोठे योगदान राहिले आहेत. भगूर नगर परिषदेवर २५ ते ३० वर्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाची सत्ता आली. भगूर येथील अजित दादांच्या सभेने नगर परिषद निवडणुकीचे वातावरण राष्ट्रवादीच्या बाजूने झुकले. परिणामी नगराध्यक्ष म्हणून प्रेरणा बलकवडे या नगराध्यक्षा झाल्या. अजितदादा पवार यांच्यावर नाशिकच्या ग्रामीण जनतेचा प्रचंड विश्वास होता. त्यांचेही नाशिकवर विशेष असे लक्ष होते. कृषी आणि सहकार खात्यांवर त्यांचे विशेष प्रेम होते. नाशिकमधील सात आमदारांसाठी ते ऊर्जा स्रोत होते. मात्र त्यांच्या अचानक जाण्याने नाशिक जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण भाग आज पोरका झाला आहे.
Comments
Add Comment

शब्दाला जागणारा नेता

महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार हे नाव साडेतीन दशके सातत्याने चर्चेत राहिले. लोकसभेची अल्पकालीन कारकीर्द

दादा माणूस!

'ते' अजातशत्रू अजिबात नव्हते. तसं होण्यासाठी त्यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत. कोणीही त्यांचा कधी द्वेष केला

घातक पाणी

इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे २७ जणांचा मृत्यू झाला आहे. जलवाहिन्यांमार्फत दूषित पाण्याचा पुरवठा आणि त्यामुळे

हे किळसवाणे कोठून येते?

विनयभंग प्रकरणाने बदलापूर गुरुवारी पुन्हा एकदा हादरलं. बेकायदेशीर शाळेच्या महिला सहाय्यक नसलेल्या व्हॅनमध्ये

रात्र आहे वैऱ्याची

आता केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत आहे. त्यात या अमेरिकन विक्रीचे आणि ट्रम्प यांच्या टॅरिफ धमकीचे पडसाद नक्की

विक्षिप्त साम्राज्यवादी

साऱ्या जगात मनमानी पद्धतीने हस्तक्षेप करण्यासाठी भौगोलिकदृष्ट्या मोक्याच्या जागा आपल्या ताब्यात हव्यात, ही