Thursday, January 29, 2026

अल्पवयीन वर्षीय अभिनेत्रीचा तसला सीन प्रसारित; प्रेक्षकांकडून थेट कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी

अल्पवयीन वर्षीय अभिनेत्रीचा तसला सीन प्रसारित; प्रेक्षकांकडून थेट कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी

मुंबई : हिंदी टीव्हीवरील एका लोकप्रिय मालिकेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. मालिकेत अल्पवयीन अभिनेत्रीला प्रौढ कलाकारासोबत दाखवण्यात आलेल्या दृश्यांमुळे प्रेक्षकांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या प्रकरणानंतर संबंधित कार्यक्रमावर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

वादग्रस्त ठरलेली हिंदी' मालिका ‘रिमझिम’ असून, अलीकडे प्रसारित झालेल्या एका भागातील दृश्ये सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहेत. या दृश्यांमध्ये प्रमुख भूमिकेत असलेली अभिनेत्री वयाने अल्प असल्याचा दावा करण्यात येत असून, प्रौढ अभिनेत्यासोबत तसले सीन दाखवण्यात आल्याचा आरोप प्रेक्षक करत आहेत.

प्रेक्षकांच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारचा आशय लहान वयाच्या कलाकारांसाठी योग्य नाहीच शिवाय अश्या मालिका टीव्हीवर दाखवणे ही योग्य नाही ,अश्या मागण्या सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत

शिवाय सोशल मीडियावर अनेकांनी निर्माते आणि वाहिनीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सेन्सॉर व प्रसारण मानकांची तपासणी झाली होती का, अशी विचारणा केली जात आहे. या घटनेमुळे मनोरंजन क्षेत्रातील बालकलाकारांच्या सुरक्षेचा आणि जबाबदारीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.. यशिका ही अल्पवयीन असताना तिला अश्या प्रकारच्या भूमिकांमध्ये पाहून प्रेक्षकांनी तिच्यावर आक्षेप घेतला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >