पुणे : हल्ली वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्यामुळे अनेक रस्ते अपघाताच्या घटना या घडत आहे. असाच एक धक्कादायक आणि निष्काळजीपणाचा कळस असलेला प्रकार पुण्यातून उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे चक्क ३० ते ४० विद्यार्थ्यांचे जीव हे टांगणीला लागले होते.
नेमकं घडलं काय?
सोमवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास वाघोली रोडवर ही घटना घडली. बायफ रोडवरील इंडो स्कॉट ग्लोबल शाळेच्या मद्यधुंद बस चालकाने चार दुचाकी आणि एका कार ला धडक जोरदार धडक दिली . बस चालकाने काही अंतरावर वाहन फरफटतही नेली.
मिळलेल्या माहितीनुसार बत्ता बसंत रसाळ (वय ५० ) असे अटक केलेल्या बस चालकाचे नाव आहे. या भयंकर अपघातानंतर नागरिकांनी शाळेच्या बसचा पाठलाग केला आणि बस थांबवली. या प्रकारामुळे संतप्त नागरिकांनी बस चालकाला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून विद्यार्थ्यांचे जीव थोडक्यात बचावले.






