मोहित सोमण: परवा सादर होणारा भारतातील अर्थसंकल्प, जागतिक अस्थिरता, भूराजकीय संकट, आर्थिक अनिश्चितता, युएस इराण यांच्यातील वाद, पुढील आठवड्यात युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदराचा निकाल व गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगत वाढववेली सुरक्षित गुंतवणूक, घसरलेला डॉलर अशा एकत्रित कारणांचा प्रभाव सोन्याचांदीच्या दरात दिसल्याने आजही सोन्याचांदीच्या दरात तुफान वाढ झाली आहे. गुड रिटर्न्स संकेतस्थळावरील माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात ३२२, २२ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २९५,१८ कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅम दरात २४२ रुपयांनी वाढ झाली त्यामुळे प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी आज १६५१७, २२ कॅरेटसाठी १५१४०, १८ कॅरेटसाठी १२३८८ रूपयांवर पोहोचले आहेत.
तर संकेतस्थळावरील माहितीनुसार, सोन्याच्या प्रति तोळा किंमतीत २४ कॅरेटकरिता ३२२० रूपयांनी, २२ कॅरेटकरिता २९५० रूपयांनी, १८ कॅरेटकरिता २४२० रूपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति तोळा दर २४ कॅरेटसाठी १६५१७०, २२ कॅरेटसाठी १५१४००, १८ कॅरेटसाठी १२३८०० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय सराफा बाजारात सोने मोठ्या प्रमाणात उसळल्याने सोन्याचे मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील प्रति ग्रॅम दर २४ कॅरेटसाठी १६५१७, २२ कॅरेटसाठी १५१४०, १८ कॅरेटसाठी १२३८८ रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) ३.९६% उसळले ज्यामुळे दरपातळी १६३९५० रूपयांवर पोहोचली. जागतिक स्तरावर सोन्याच्या गोल्ड फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ३.७१% वाढ झाली आहे.
सुरक्षित गुंतवणुकीच्या वाढत्या मागणीमुळे आणि डॉलरमधील दीर्घकाळच्या कमजोरीमुळे धातू बाजाराला फायदा झाल्याने बुधवारी सोन्याच्या किमती प्रति औंस ५२०० डॉलर प्रति औंसवर विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत. आज इतर इतर मौल्यवान धातूंचे भावही तेजीत राहिले असून चांदी आणि प्लॅटिनम दोन्ही त्यांच्या अलीकडील विक्रमी उच्चांकाच्या जवळ पोहोचले आहेत. दिवसाच्या उत्तरार्धात फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या निष्कर्षापूर्वी असलेल्या सावधगिरीमुळे सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीला आधार मिळाला. त्यामुळे आज स्पॉट सोन्याचा भाव प्रति औंस ५२६६.३८ डॉलरच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला असून जागतिक स्तरावर एप्रिलसाठीच्या सोन्याच्या वायदा भावाने प्रति औंस ५२९७.८६ डॉलरचा उच्चांक गाठला होता.
भू-राजकीय तणाव, धोरणात्मक अनिश्चिततेमुळे सोन्याला फायदा झाला असताना दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या दिशेने दुसरा नौदल ताफा जात असल्याचे आणि तो देश वॉशिंग्टनसोबतचा करार स्वीकारेल अशी आशा असल्याचे विधान केल्यानंतर सोन्याच्या दरात आणखी मागणी निर्माण झाली. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी मजबूत राहिली. पुढील आठवड्यात युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
अमेरिकेच्या धोरणांबद्दलची अनिश्चितता या वर्षी सोन्याच्या तेजीचे एक प्रमुख कारण ठरली आहे.व्हेनेझुएलामधील हस्तक्षेप आणि ग्रीनलँडवरील वादामुळे जागतिक भूराजकीय तणाव वाढला आहे. गेल्या वर्षी उत्कृष्ट नफा नोंदवल्यानंतर सोन्याच्या दरात २०२६ मध्ये आतापर्यंत सुमारे २०% वाढ झाली असल्याचे आकडेवारीत स्पष्ट होते. यासह डॉलरमध्येही घसरण झाल्याने कमोडिटीतील दबाव वाढला.डॉलरमधील कमजोरीचा फायदा सोने आणि धातू बाजारांनाही झाला.या आठवड्यात डॉलर जवळपास चार वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरला. ट्रम्प यांनी मंगळवारी सांगितले की त्यांना कमकुवत डॉलरची पर्वा नाही. तज्ञांच्या मते या कृतीमुळे चलनामध्ये आणखी मोठी घसरण झाली. फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांच्या मौद्रिक धोरणावरील दृष्टिकोनावर आणि व्याजदरात मोठी कपात करण्याच्या वॉशिंग्टनच्या अलीकडील दबावावर फेड अध्यक्ष काही बोलणार आहेत की नाही यामुळेच कमोडिटी बाजाराचे यावर सर्वांचे लक्ष केंद्रित असेल.
चांदीच्या दरातही तुफान वाढ
चांदीच्या दरातही आज तुफान वाढ झाली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १० रूपयांनी व प्रति किलो दरात १०००० रूपयांनी वाढ झाली. त्यामुळे प्रति ग्रॅम दर ३८० व प्रति किलो दर ३८०००० रूपयांवर पोहोचला आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार मुंबईसह भारतातील प्रमुख शहरातील चांदीचे प्रति १० ग्रॅम दर ३८०० व प्रति किलो दर ३८०००० रूपयांवर पोहोचले. गेल्या फक्त ३ दिवसांत चांदीच्या दरात ४५००० रूपयांनी वाढले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये चांदीच्या निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ५.८४% वाढ झाल्याने दरपातळी ३७७०९२ रूपयांवर पोहोचली. जागतिक स्तरावर चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ६.७७% वाढ झाली आहे. वाढलेल्या औद्योगिक मागणीसह जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर चांदीच्या दरातही आज तुफान वाढ झाली.






