Wednesday, January 28, 2026

मारूती सुझुकी कंपनीचा दमदार तिमाही निकाल महसूलात २९% वाढ

मारूती सुझुकी कंपनीचा दमदार तिमाही निकाल महसूलात २९% वाढ

मोहित सोमण: आज मारूती सुझुकी लिमिटेड (Maruti Suzuki Limited) या प्रसिद्ध कंपनीने आपला तिमाही निकाल जाहीर केला आहे. या आर्थिक निकालातील माहितीनुसार, कंपनीच्या महसूलात इयर ऑन इयर बेसिसवर २९% वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या ३८७५२ कोटी तुलनेत या तिमाहीत ४९८९२ कोटींवर वाढ महसूलात कंपनीने नोंदवली होती. तर कंपनीच्या वाहन विक्री व्हॉल्यूम (Sales Volume) मध्ये इयर ऑन इयर बेसिसवर १७.९% वाढ कंपनीने नोंदवली गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ५६६२१३ तुलनेत ही वाढ ६६७७६९ पातळीवर वाढली असल्याचे कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये स्पष्ट केले. तसेच कंपनीच्या माहितीनुसार, ऑपरेटिंग ईबीटा (Operating EBITDA) इयर ऑन इयर बेसिसवर ५०६४ कोटीवरून ५५१८ कोटींवर पोहोचला आहे. तर कंपनीच्या करपूर्व कमाईत (Earning before interest tax EBIT) इयर ऑन इयर बेसिसवर ५.५% वाढ नोंदवली आहे. तर कंपनीच्या एक्सचेंज फायलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या मटेरियल खर्चात २२० बीपीएसने वाढ झाली असून ती ७४ वरून ७६.२ वर पोहोचली.

दरम्यान इतर खर्चात (Other Expenses) इयर ऑन इयर बेसिसवर १३० बेसिसने घसरण झाल्याने तो १२.७ वरून ११.४ पातळीवर पोहोचला. यासह कंपनीने दिलेल्या माहितीत नव्या कामगार कायदा (New Labour Code) अंतर्गत कंपनीने ५९४ कोटींची तरतूद केल्याने याचाही परिणाम निकालात झाल्याचे कंपनीने स्पष्ट केले. दरम्यान प्रतिकूल वस्तूंच्या किमती आणि दुर्मिळ मृदा घटकांच्या (REE)पुरवठ्याच्या समस्यांमुळे होणारा परिणाम मार्जिनमध्ये झाल्याचही कंपनीने स्पष्ट केले तसेच मालाच्या साठ्यात घट झाल्यामुळे निश्चित खर्चाचे प्रतिकूल प्रमाण,काही मॉडेल्सच्या किमतींमध्ये कपात, नवीन कामगार संहितांमुळे कर्मचाऱ्यांच्या खर्चात वाढ झाल्यामुळे एक-वेळची तरतूद, सकारात्मक घटक यांचा परिणाम नफ्यात झाल्याचे. कंपनीने स्पष्ट केले. तर फायद्याच्या बाजूने अनुकूल ऑपरेटिंग लाभ,अनुकूल उत्पादन मिश्रण (Product Mix),विक्री प्रोत्साहन खर्चात घटा या मुद्यांचा निकालावर सकारात्मक परिणाम झाल्याचे कंपनीने यावेळी स्पष्ट केले.

कंपनीने निकालात दिलेल्या माहितीनुसार, घरगुती वाहनांच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तिमाहीतील तुलनेत २०.९% वाढ झाल्याने ही एकूण विक्री ५६४६६९ पातळीवर पोहोचली आहे. तर निर्यातीत पाहिल्यास कंपनीच्या एकूण निर्यातीत इयर बेसिसवर ३.९% वाढ झाली ती १०३१०० पातळीवर पोहोचली असून एकूणच दोन्ही प्रकारच्या विक्रीसह एकूण विक्रीत १७.९% वाढ कंपनीने नोंदवली. ती आता ६६७७६९ पातळीवर पोहोचली असल्याचे कंपनीने स्पष्ट केले. गेल्या म्हणजेच दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ७.३% अधिक नफा प्राप्त झाला होता जो ३२९३ कोटींवर पोहोचला. तर गेल्या तिमाहीत कंपनीच्या घरगुती घाऊक विक्रीत ५.१% घसरण झाली होती तर निर्यातीत मात्र ४२.२% वाढ नोंदवली होती. आज कंपनीचा शेअर २.३९% घसरत १४८८० रूपये प्रति शेअरवर बंद झाला आहे. गेल्या ५ दिवसात शेअर्समध्ये ६.०७% घसरण झाली असून महिन्यात शेअर्समध्ये १०.०५% घसरण झाली आहे. तर वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये २२.७३% वाढ झाली असून इयर टू डेट बेसिसवर (YTD) शेअर्समध्ये १०.९४% घसरण झाली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा