Wednesday, January 28, 2026

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनाने गौतम अदानींनी शोककळा व्यक्त केली

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अकाली निधनाने गौतम अदानींनी शोककळा व्यक्त केली

मुंबई:अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी बुधवारी बारामतीजवळ झालेल्या अजितदादांसह सहा व्यक्तींच्या अपघातावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. 'एक्स' वर पोस्ट करत त्यांनी महिनाभरापूर्वी बारामतीमध्ये झालेल्या भेटीची आठवण करून दिली असून त्यांनी राष्ट्र व राज्याच्या उभारणीसाठी असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेबद्दल पोस्टमध्ये उद्देशून म्हटले आहे. या पोस्टवर लिहिताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने खूप दुःख झाले.अवघ्या एका महिन्यापूर्वी, आम्ही बारामतीमध्ये शरद पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन एआयच्या उद्घाटनासाठी एकत्र उभे होतो तो क्षण अजितजींची दूरदृष्टी, प्रगतीवरील त्यांचा विश्वास आणि भारताच्या तरुणाई व भविष्याप्रती त्यांची वचनबद्धता दर्शवणारा होता' असे गौतम अदानी म्हणाले आहेत.

पुढे, 'भविष्यासाठी सज्ज महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांनी सुरू ठेवलेल्या कार्याला पुढे नेऊन आपण त्यांच्या कार्याचा सन्मान करूया. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो' असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.आज सकाळी ८.४६ वाजता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पवार आणि इतर चार जणांचा बारामतीजवळ विमान अपघातात मृत्यू झाला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या मृत्यूंची पुष्टी केली. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार एका जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी मुंबईहून बारामतीला प्रवास करत होते. दरम्यान तांत्रिक कारणामुळे बारामतीजवळ उतरत हा मोठा अपघात झाल्याने अजित पवारांचा जागीच मृत्यू झाला. विमान मुंबईहून उड्डाण केल्यानंतर सुमारे एका तासाने हा अपघात झाला. बारामती येथील घटनास्थळी आपत्कालीन सेवा आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित होते. लँडिंगच्या वेळी विमानाचा ताबा सुटल्यानंतर तात्काळ बचाव पथके तैनात करण्यात आली.

शोक व्यक्त करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांना 'सामान्य जनतेचे नेते, ज्यांचा तळागाळातील लोकांशी घट्ट संबंध होता' असे म्हटले होते तसेच 'प्रशासकीय बाबींची त्यांची समज आणि गरीब व वंचितांना सक्षम करण्याची त्यांची तळमळही उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना माझ्या संवेदना' असे पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट केले होते.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. अजित पवार यांचे अकाली निधन ही एक कधीही भरून न येणारी हानी आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी, विशेषतः सहकार क्षेत्रात दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना नेहमीच स्मरणात ठेवले जाईल असे राष्ट्रपतींनी एक्सवर म्हटले होते. गेल्या महिन्यात बारामतीत आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटरचे उद्घाटन करताना गौतम अदानी यांच्यासह शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे व इतर मान्यवर व दिग्गज नेते उपस्थित होते. त्याच धर्तीवर गौतम अदानी यांनी यावेळी झालेल्या घटनेनंतर शोककळा व्यक्त केली आहे.

Comments
Add Comment