Wednesday, January 28, 2026

भारत युरोपियन द्विपक्षीय करारानंतर भारतीय एमएसएमई उद्योगांना २३ ट्रिलियन डॉलरची बाजारपेठ उघडणार

भारत युरोपियन द्विपक्षीय करारानंतर भारतीय एमएसएमई उद्योगांना २३ ट्रिलियन डॉलरची बाजारपेठ उघडणार

प्रतिनिधी: काल झालेल्या भारत ईयु एफटीए कराराचा मोठा फायदा भारतीय बाजारपेठेत होणार आहे. अशातच याचा मोठा फायदा लघू सूक्ष्म मध्यम (MSME) उद्योगांना होईल असे प्रसारमाध्यमांना पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (PHDCCI) संस्थेने म्हटले आहे. यावेळी बोलताना युरोपियन युनियनसोबतचा व्यापारी करार भारतीय एमएसएमईसाठी २३ ट्रिलियन डॉलर्सची बाजारपेठ खुली करणार असे पीएचडीसीसीआयने म्हटले. करार भारतीय उद्योगांना २३ ट्रिलियन डॉलर्सच्या विशाल अर्थव्यवस्थेत प्रवेश मिळवून देईल असे त्या म्हटले आहे. ज्याचा मोठा फायदा भारतीय अर्थव्यवस्थेला व विशेषतः लघु उद्योगांना होईल असे सांगितले जात आहे.

२७ देशांशी जोडणारा हा करार भारताच्या व्यापारी बाजारापेठेला विना शुल्क निर्यातीसाठी उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः आपली निर्यात वाढवण्यासाठी छोट्या उद्योजकांना याचा फायदा होईल याविषयी बोलतानाच नुकताच झालेल्या भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार (FTA) सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (MSMEs) महत्त्वपूर्ण व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणार आहे ज्यामुळे देशाच्या आर्थिक परिस्थितीत एक मोठे परिवर्तन घडणार आहे असे त्यांनी म्हटले.

तसेच पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (PHDCCI) चे सीईओ आणि सरचिटणीस रणजीत मेहता यांनी,'करार भारतीय उद्योगांना २३ ट्रिलियन डॉलर्सच्या विशाल अर्थव्यवस्थेत प्रवेश मिळवून देईल' असे म्हटले आहे. लहान व्यवसायांसाठी एक महत्त्वाचा आधारस्तंभ ठरेल अशी अपेक्षा आहे.बोलताना डॉ. मेहता म्हणाले, भारत-युरोपियन युनियन करार हा एक महत्त्वाचा आर्थिक टप्पा आहे. यामुळे भारतीय उद्योगांना सुमारे २३ ट्रिलियन डॉलर्सच्या बाजारपेठेत पोहोचण्याचा मार्ग खुला झाला आहे. युरोपियन युनियनमध्ये सुमारे २७ देशांचा समावेश आहे. मला वाटते की यामुळे आमच्या एमएसएमईसाठी विशेषतः अमेरिकेच्या शुल्कामुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या एमएसएमईसाठी,आणखी मोठ्या व्यावसायिक संधी निर्माण होतील.त्यांनी पुढे सांगितले की, उद्योगाला मोठ्या प्रमाणात तांत्रिक एकात्मता आणि भारतीय अर्थव्यवस्थेत वाढीव गुंतवणुकीची अपेक्षा आहे, आणि या कराराचे वर्णन त्यांनी युरोपियन युनियन आणि भारत या दोघांसाठीही फायदेशीर परिस्थिती असे केले.

या नवीन चौकटीअंतर्गत प्रमुख श्रम-केंद्रित क्षेत्रे (Labour Intensive Field) वाढीचे नेतृत्व करण्यास सज्ज आहेत. हा करार पारंपारिक निर्यात श्रेणींना दिलासा आणि विस्तारावर लक्ष केंद्रित करतो, ज्यांना अलीकडेच जागतिक व्यापारातील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला आहे असेही ते पुढे म्हणाले आहेत.

वस्त्रोद्योग, तयार कपडे, रत्ने आणि दागिने यांसारख्या क्षेत्रांना याचा निश्चितच फायदा होईल. आणि यामुळे आपल्या देशात रोजगाराच्या संधींची दारेही उघडतील असे मेहता यांनी यावेळी नमूद केले. भारत आणि युरोपियन युनियनची एकत्रित लोकसंख्या २ अब्जाहून अधिक आहे, जी जागतिक अर्थव्यवस्थेच्या अंदाजे २५% आहे. बोलताना त्यांनी हा करार दोन्ही प्रदेशांमध्ये विशेषतः तांत्रिक क्षेत्रांमध्ये, सखोल संरचनात्मक एकात्मतेवर देखील भर देतो. मेहता यांनी स्पष्ट केले की ही भागीदारी जागतिक मूल्य साखळीत, विशेषतः लॉजिस्टिक्स आणि उत्पादन यांसारख्या क्षेत्रांमध्ये, एकात्मता साधत आहे असे पुढे ते म्हणाले आहेत. पीएचडीसीसीआयच्या विश्लेषणानुसार, बाजारपेठ विस्तारत असल्याने वस्तू आणि सेवांची मागणी मजबूत राहिली आहे. उद्योग संघटनेला अशी अपेक्षा आहे की,नवीन करारामुळे निर्माण झालेल्या अनुकूल व्यापारी वातावरणामुळे येत्या काही महिन्यांत ही सकारात्मक गती कायम राहील.

आमच्या विश्लेषणानुसार, वस्तू आणि सेवांना अधिक मजबूत मागणी असल्याचे दिसून येते. तसेच, येत्या तिमाहीत अधिक मजबूत वाढ अपेक्षित आहे. मला वाटते की, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs) बाजाराबद्दल उत्साही आहेत आणि विशेषतः भारत आणि युरोपियन युनियन यांच्यातील व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर. या मुक्त व्यापार कराराद्वारे सर्व छोट्या व मध्यम लघू उद्योग व उद्योजकांना (MSMEs) ना फायदा होणार आहे असे अंतिमतः मेहता म्हणाले आहेत.

Comments
Add Comment