बारामती : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचे, रूबाबदार आणि 'दादा' नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण राज्य सुन्न झाले आहे. वित्त व नियोजन मंत्री म्हणून राज्याची धुरा सांभाळणाऱ्या एका व्हिजनरी नेत्याच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते राज्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी दादांना अत्यंत जड अंतःकरणाने श्रद्धांजली वाहिली आहे. अजित दादांच्या निधनाची बातमी समजताच पवार कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांना आपले अश्रू अनावर झाले होते. दादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण बारामती त्यांच्या दुःखात सहभागी झाली आहे.
बारामती : संपूर्ण महाराष्ट्र आज एका अत्यंत दुर्दैवी आणि सुन्न करणाऱ्या बातमीने जागा झाला. बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला ...
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून सांत्वन
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने बारामती गाठली. विद्या प्रतिष्ठान येथे त्यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्यासह सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. यावेळी समोर आलेली छायाचित्रे मन सुन्न करणारी होती; हात जोडून उभ्या असलेल्या सुनेत्रा वहिनींचे सांत्वन करताना दोन्ही नेत्यांनाही आपले दुःख आवरता आले नाही. अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या कर्मभूमीत, म्हणजेच बारामतीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. या अंत्यविधीसाठी स्वतः पंत्रप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर बारामतीकडे लोटला आहे.





