Ajit Pawar Passed Away : राज्यातील सर्व शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यातील सर्व शाळांना राज्य सरकारने आज बुधवार २८ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज बुधवार २८ जानेवारी रोजी बारामती येथे मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला असून अजून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अजित पवार यांचं विमान जळून खाक झाल्याचं समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्व शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.


राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात ३ दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की,  "हा पवार कुटुंबावर मोठा आघात आहे. या दु:खाच्या वेळी आम्ही त्यांच्यासोबत आहोत.  मी सकाळपासून सर्वांच्या संपर्कात आहे. सुप्रिया सुळे आणि पार्थ पवारसोबत माझे बोलणे झाले आहे. माझा अजूनही या गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे.  महाराष्ट्राकरिता आजचा दिवस हा अतिशय कठीण असा दिवस आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी ते अत्यंत महत्वपूर्ण योगदान देत होते.  माझा दमदार  आणि दिलदार मित्र निघून गेला. "


असा झाला अपघात : 



अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्याठिकाणचे प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक माहिती दिली आहे. "पहिल्यांदा ते विमान वरुन गेलं, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं. नंतर विमान फिरलं आणि खाली जमीनीला लागलं, तेव्हा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले. विमान जागेवर फिरलं आणि लगेच स्फोट झाला." असं एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामती दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला. नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) दिलेल्या माहितीनुसार, या दुर्दैवी घटनेत विमानातील सर्व ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

आज सकाळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत दाखल होणार होते. विमान धावपट्टीवर उतरत असताना तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाला. सुरुवातीला उपमुख्यमंत्री गंभीर जखमी असून त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, काही वेळातच DGCA कडून अधिकृत दुजोरा मिळाला की, अपघात इतका भीषण होता की विमानातील सहाही जणांनी आपले प्राण गमावले आहेत.


Comments
Add Comment

FDA Inspections : अंगणवाडीतील खिचडी आणि शाळांमधील ‘मिड-डे मील’ची तपासणी होणार; अन्न व औषध प्रशासनाचे निर्देश

शासकीय आणि खासगी यंत्रणांवर कारवाईचा बडगा मुंबई : अन्न सुरक्षेच्या मुद्यावर राज्यभरात धडक मोहीम राबवणारे अन्न

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.

Bhandup Incident : दहाव्या मजल्यावरून पडली अन् झाडात अडकली; भांडुपच्या घटनेचा VIDEO पाहून धक्का

मुंबई : मुंबईतील भांडुप परिसरातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. भांडुपमधील सनशाईन SRA इमारतीच्या

'BEST' electricity : गणेशोत्सव मंडळांसाठी 'BEST'चे नवे वीज नियम; तात्पुरत्या कनेक्शनसाठी अर्जापासून शुल्कापर्यंत सर्व माहिती

मुंबई : गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा