Wednesday, January 28, 2026

Ajit Pawar Passed Away : पंतप्रधान मोदींसह अमित शहा यांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा

Ajit Pawar Passed Away : पंतप्रधान मोदींसह अमित शहा यांची मुख्यमंत्री फडणवीसांसोबत चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी बुधवार २८ जानेवारी रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क करून चर्चा केली. यावेळी त्यांनी बारामतीत झालेल्या अजित पवार यांच्या विमान अपघाताची माहिती घेतली.  या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर पाच जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
आज सकाळी ८:४८ वाजता अजित पवार यांना मुंबईहून बारामतीला घेऊन जाणारे लिअर जेट ४५ विमान, व्हीटी-एसएसके, बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना धावपट्टीवरून घसरले आणि हा भीषण अपघात घडला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचे दोन सदस्य आणि दोन क्रू मेंबर्ससह विमानात उपस्थित होते आणि या घटनेत सर्वांचा मृत्यू झाला.
जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी जाहीर सभांना संबोधित करण्यासाठी अजित पवार पुणे जिल्ह्यातील त्यांच्या जन्मगावी बारामती येथे जात होते.  बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, बारामती विमानतळाच्या धावपट्टीवर विमान उतरत असताना अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने वैमानिकाचा ताबा सुटला आणि हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर सर्वत्र मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते.
हा अपघात नेमका कोणत्या कारणांमुळे झाला हे शोधण्यासाठी नागरी विमान वाहतूक विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >