Wednesday, January 28, 2026

ACC Cement कंपनीचा तिमाही निकाल जाहीर करोत्तर नफ्यात ५४% घसरण

ACC Cement कंपनीचा तिमाही निकाल जाहीर करोत्तर नफ्यात ५४% घसरण

मोहित सोमण: अदानी समुहाची कंपनी म्हणून ओळखली जाणारी एसीसी लिमिटेड (ACC Limited) कंपनीचा आर्थिक तिमाही निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार इयर ऑन इयर बेसिसवर सिमेंट कंपनीच्या करोत्तर नफ्यात (Profit after tax PAT) ५४% घसरण झाली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या १०८९.०७ कोटी तुलनेत या डिसेंबर तिमाहीत कंपनीचा नफा ५४१.४० कोटीवर पोहोचला. तसेच कंपनीच्या उत्पन्नात गेल्या डिसेंबरमध्ये असलेल्या ६५८४.३२ कोटी तुलनेत या तिमाहीत इयर ऑन इयर बेसिसवर ६५१६.७७ कोटीवर घसरण झाली आहे. तर कंपनीच्या महसूलात एकत्रित उत्पन्नात (Comprehensive Income) इयर ऑन इयर बेसिसवर १०८८.३२ कोटीवरून ५२६.०९ कोटींवर घसरण नोंदवली गेली आहे.

आकडेवारीनुसार, करपूर्व नफ्यात (Profit before tax) १४७५.३२ कोटीवरून ४३८.६५ कोटींवर घसरण झाली आहे. तर यंदा एकूण खर्चातही वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीतील ६५८४.३२ कोटी तुलनेत या तिमाहीत ६५१६.७७ कोटीवर घसरण झाली आहे.ईपीएस (Earning per share EPS) ५७.८४ रूपयांवरून २८.७६ रूपयांवर घसरण झाली आहे. यापूर्वी ३१ मार्च २०२५ रोजी संपलेल्या वर्षात, कंपनीने तिच्या पूर्ण मालकीच्या उपकंपनी एसीसी मिनरल रिसोर्सेस लिमिटेड (AMRL) मार्फत, अक्कय इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, अनंतरूप इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड,इक्वेकर रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, फोरसाईट रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, कृतांत इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, क्षोभ रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड,प्रजाग इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड,सत्यमेधा रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, ट्रायग्रो इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, वरंग रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, व्हिक्टरलेन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, विहाय रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, वृषक रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेड, पीअरलिटिक्स प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या एकूण १५ कंपन्यांचे अधिग्रहण केले होते.

याविषयी बोलताना कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये, या १५ भागधारकांसोबत २२ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या शेअर खरेदी करारांवर (SPAs) आणि वेस्ट पीक रियल्टर्स प्रा यव्हेट लिमिटेडच्या भागधारकांसोबत ११ मार्च २०२५ रोजीच्या शेअर खरेदी करारावर स्वाक्षरी करून कंपन्यांची १००% मतदानाचा हक्क असलेली भागभांडवल २९८.६१ कोटींच्या रोख मोबदल्यात संपादित केले.' असे म्हटले. तसेच AMRL ने या कंपन्यांना आंतर-कंपनी ठेवींच्या माध्यमातून ३८०.५७ कोटींचा निधी पुरवला होता.यापैकी काही कंपन्यांकडे जमिनीचे भूखंड आहेत, ज्यांचा वापर उत्पादन सुविधा उभारण्यासाठी केला जाणार आहे आणि इतरांकडे चुनखडीचे साठे असलेले महत्त्वपूर्ण जमिनीचे भूखंड आहेत, ज्यांचे खाणकाम हक्क होल्डिंग कंपनीकडे आहेत. अशा खाणी होल्डिंग कंपनीसोबतच्या भाडेपट्ट्याच्या करारांवर आधारित कार्यान्वित केल्या जात आहेत.AMRL ने १३ कंपन्यांचे संपादन २७ फेब्रुवारी २०२५ रोजी, १ कंपनीचे २८ फेब्रुवारी २०२५ रोजी आणि १ कंपनीचे १३ मार्च २०२५ रोजी पूर्ण केले आहे.

याव्यतिरिक्त, ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीत, AMRL ने चेसपॉइंट प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड आणि पाइन हिल्स रियल्टर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या भाग धारकांसोबत १९ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या शेअर खरेदी करारांवर (SPAs) स्वाक्षरी केली आणि उपरोक्त २ कंपन्यांचे संपादन १९ नोव्हेंबर, २०२५ रोजी १७.८६ कोटींच्या रोख मोबदल्यात पूर्ण केले. या कंपन्यांकडेही चुनखडीचे साठे असलेले महत्त्वपूर्ण जमिनीचे भूखंड आहेत. यापूर्वी कंपनीला दुसऱ्या तिमाहीत ४६०% अधिक निव्वळ मिळवला होता जो १११९ कोटींवर पोहोचला तर महसूलातही गेल्या तिमाहीत २८% वाढ नोंदवली होती. आज दुपारी २.४२ वाजेपर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये ०.२९% घसरण झाली आहे. तर गेल्या ५ दिवसात कंपनीच्या शेअर्समध्ये ०.५३% घसरण झाली आहे तर महिन्यात शेअर्समध्ये २.४५% घसरण झाली असून वर्षभरात कंपनीच्या शेअर्समध्ये १५.९०% घसरण झाली आहे तर इयर टू डेट बेसिसवर (YTD) शेअर्समध्ये ३.३०% घसरण झाली आहे. २०२२ मध्ये अदानी समूहाने एसीसी व अंबुजा सिमेंट अधिग्रहणाची सुरूवात केली होती. आता दोन्ही कंपन्याचे एकत्रिकरण स्कीम ऑफ अरेंजमेंट अंतर्गत करण्यात आले आहे.

Comments
Add Comment