रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १७३ उमेदवार रिंगणात

पंचायत समितीची एक जागा बिनविरोध; ११७ जागांसाठी ३२९ उमेदवार रिंगणात


अलिबाग  : रायगड जिल्हयातील ५९ जिल्हा परिषद गट आणि ११८ पंचायत समिती गणांच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्ज माघारीची मुदत मंगळवारी संपली. दुपारी तीननंतर जिल्हयातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणांतील निवडणूक लढतींचे चित्र स्पष्ट झाले. जिल्हयातील अनेक गट आणि गणांमध्ये बहुरंगी लढतीचे चित्र असून, जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी १७३ उमेदवार रिंगणात आहेत, तर पंचायत समितीची महाडमधील धामणेची जागा बिनविरोध झाली आहे. आता ११७ जागांसाठी ३७४ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक रिंगणातील उमेदवार निश्चित झाल्याने आता जिल्हयात खऱ्याअर्थाने निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार आहे.


जिल्ह्यात ५९ जिल्हा परिषद गट आणि ११८ पंचायत समिती गणांसाठी निवडणूक होत आहे. जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडी अशी लढत अपेक्षित असली, तरी जागा वाटप निश्चित न झाल्याने काही ठिकाणी इच्छुकांनी बंडाचा पवित्रा घेतल्याने युती आणि आघाडीची समिकरण जुळवताना अडचणी निर्माण झाल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आघाडी घेतलेली दिसली. शिवाय यावेळी अपक्ष उमेदवारांची संध्या अधिक असून, दिग्गज उमेदवारांपुढे त्यांनी आव्हान निर्माण केले असल्याचे दिसून येत आहे.उमेदवारी अर्ज माघारीनंतर जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांतील निवडणूक लढर्तीचे चित्र स्पष्ट झाले झाले आहे. जिल्हयात बहुतांश गट आणि गणांमध्ये बहुरंगी लढतीचे चित्र आहे. काही ठिकाणी युती आणि आघाडीतील घटक पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या समोर उभे आहेत.आता निवडणूक लढतींचे चित्र स्पष्ट झाल्याने सर्वच पक्ष आणि उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. बुधवारपासून राजकीय पक्ष आणि उमेदवारांकडून नियोजित पद्धतीने निवडणूक प्रचार सुरु होणार आहे. त्यामुळे या प्रचार सभा, बैठका आणि रॅल्यांमुळे जिल्हयातील राजकीय वातावरण आणखी तापणार आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या प्रचार सभा बैठकांमधून आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी झाडलेल्या दिसणार आहेत. येत्या पाच फेब्रुवारी रोजी मतदान होत असून, तत्पूर्वी मतदान संपण्याच्या चोवीस तास आधी जाहीर प्रचार बंद होणार आहे. त्यामुळे आगामी सात दिवस निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार आहे.


रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ गटांसाठी निवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेची सत्ता स्थापनेसाठी ३० ही मॅजिक फिगर आहे. ही फिगर गाठण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांची घडपड सुरू आहे, महायुती आणि महाआघाडीच्या जागा वाटपाबाबत शेवटपर्यंत चर्चा सुरु होत्या. त्यामुळे सर्वच पक्षांना मॅजिक फिगर गाठताना कसरत करावी लागणार आहे. जिल्हा परिषद यांनी एकत्र येऊन हे "कॉपीमुक्त अभियान" सफल करायचे असून, या अभियानामध्ये पालकांनीही सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हाधिकारी जावळे यांनी पालकांना केले आहे.

Comments
Add Comment

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे.

Burgman 2026 Maxi-Scooter : भारतामध्ये सुझुकीची नवीन बर्गमन 2026 मॅक्सी स्कूटर लॉन्च

मुंबई : जपानी वाहन निर्माता कंपनी सुझुकीने भारतात आपली नवीन बर्गमन 2026 मॅक्सी स्कूटर लॉन्च केली आहे. या स्कूटरची

"देऊळ बंद २" येतोय २१ मे रोजी

मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि

मातृभूमी’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित

मुंबई : सलमान खान फिल्म्स संगीतने सर्वांच्या आवडीच्या ‘चांद देख लेना’ या गाण्याचा एक विशेष पडद्यामागील व्हिडीओ

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन

सोलापूर : श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ संपर्क कार्यालय येथे आज श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ