Wednesday, January 28, 2026

मीरा-भाईंदरमध्ये १०० कोटींचा ‘विचित्र’ पूल!

मीरा-भाईंदरमध्ये  १०० कोटींचा ‘विचित्र’ पूल!

व्हिडीओ व्हायरल; एमएमआरडीएचे स्पष्टीकरण

भाईंदर : मीरा–भाईंदरमध्ये एमएमआरडीएने उभारलेल्या सुमारे १०० कोटी रुपये खर्चाच्या चार मार्गिकेचा डबल डेकर उड्डाणपुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून पुलाच्या रचनेवर जोरदार टीका होत आहे. व्हिडिओमध्ये चार पदरी पूल पुढे अचानक दोन पदरी होताना दिसत असल्याने नेटकऱ्यांनी या पुलाला ‘विचित्र’ म्हणत ट्रोल केले आहे. हा पूल मेट्रो लाईन-९ प्रकल्पाचा भाग असून फेब्रुवारी २०२६ मध्ये उद्घाटन होण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या कथित ‘बॉटलनेक’ रचनेवरून आक्रमक भूमिका घेत इंजिनीअर्सना प्रतीकात्मक स्वरूपात ‘वस्तरा’ देण्याची घोषणा केली आहे.

टीकेनंतर एमएमआरडीएने स्पष्टीकरण देत सांगितले की, पूल अरुंद झाल्याचा दावा चुकीचा असून ही रचना जागेच्या उपलब्धतेनुसार आणि भविष्यातील नियोजनाचा भाग आहे. सध्या भाईंदर पूर्व दिशेचा मार्ग तयार असल्याने दोन लेन दिसत असून भविष्यात भाईंदर पश्चिमकडे जाण्यासाठी आणखी लेन प्रस्तावित असल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment