मुंबई: २६ जानेवारीनिमीत्त लावण्यात आलेले २ स्पिकर लहान मुलीवर कोसळल्यामुळे मुलीचा जागेवरच मृत्यु झाला आहे. विक्रोळीतील या घटनेमुळे तेथील परिसरामध्ये वेगळीच खळबळ उडाली आहे. हा प्रकार मुंबईतील विक्रोळी येथील टागोर नगर मध्ये घडली आहे.हा सर्व प्रकार CCTV मध्ये कैद झाल्यामुळे समोर आला आहे.
नक्की घडलं काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त आंबेडकर नगर परिसरात सार्वजनिक कार्यक्रमासाठी मोठा स्पीकर उभारण्यात आला होता. कार्यक्रमानंतरही हा स्पीकर तसाच उभा असल्याचे सांगितले जात आहे. याच दरम्यान तीन वर्षांची चिमुरडी परिसरात खेळत आणि धावत असताना अचानक स्पीकर तिच्या अंगावर कोसळला. स्पीकरचा जोरदार आघात बसल्याने ती गंभीर जखमी झाली.
अपघातानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रजासत्ताक दिनानिमित्त आंबेडकर नगर परिसरात सार्वजनिक कार्यक्रमासाठी मोठा स्पीकर उभारण्यात आला होता. कार्यक्रमानंतरही हा स्पीकर तसाच उभा असल्याचे सांगितले जात आहे. याच दरम्यान तीन वर्षांची चिमुरडी परिसरात खेळत आणि धावत असताना अचानक स्पीकर तिच्या अंगावर कोसळला. स्पीकरचा जोरदार आघात बसल्याने ती गंभीर जखमी झाली.
अपघातानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
या प्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून घटनेचा सखोल तपास सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांसाठी लावण्यात येणाऱ्या साहित्याच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. निष्पाप चिमुरडीचा बळी जाणे ही अत्यंत दुर्दैवी घटना असून जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.






