प्रतिनिधी: गुंतवणूकदारांनी आज जागतिक अस्थिरता असताना नफा बुकिंगसाठी प्रयत्न सुरु केले असताना मोतीलाल ओसवाल फायनांशियल सर्विसेसने काही शेअर चांगल्या परताव्यासाठी गुंतवणूकदारांना सुचवले आहेत जाणून घेऊयात कुठले शेअर गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकतील वाचा यादी थोडक्यात -
१) Shriram Finance - ब्रोकरेजने श्रीराम फायनान्स कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून सीएमपी (सामान्य खरेदी किंमत CMP) १००४ रूपये निश्चित केली आहे. तर ब्रोकरेज मते, २०% अपसाईडसह १२०० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत (Target Price TP) निश्चित करण्यात आली आहे.
२) Kotak Mahindra Bank- कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये ब्रोकरेजने सीएमपी ४२३ रूपये निश्चित केली असून १८% अपसाईड वाढीसह ब्रोकरेजने ५०० रूपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.
३) JSW Steel- जेएसडब्लू स्टील शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून ११७० रूपये सीएमपीसह १५% अपसाईड वाढ अपेक्षित केली आहे. ब्रोकरेजने शेअरसाठी १३५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.
४) DLF- डीएलएफ कंपनीच्या शेअरला ब्रोकरेजने बाय कॉल दिला असून सीएमपी ५८८ रूपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली आहे. तर ६५% अपसाईड वाढीसह ब्रोकरेजने ९७४ रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.
५) Godrej Consumer- ब्रोकरेजने कंपनीच्या शेअरला बाय कॉल दिला असून १२४० रूपये प्रति शेअर सीएमपी निश्चित केली आहे. १७% अपसाईड वाढीसह ब्रोकरेजने १४५० रूपये प्रति शेअर लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.