Tuesday, January 27, 2026

प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहाला गालबोट; स्पीकर कोसळून तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

प्रजासत्ताक दिनाच्या उत्साहाला गालबोट; स्पीकर कोसळून तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू

सोमवार २६ जानेवारी रोजी स्पीकर कोसळून एका तीन वर्षांच्या चिमूरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना विक्रोळी येथे घडली. विक्रोळीच्या टागोर नगरमधील आंबेडकर नगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला.

सोमवारी संपूर्ण भारत देशात ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष सुरू असताना विक्रोळीत मात्र या उत्साहाला गालबोट लागलं आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त लावण्यात आलेला स्पीकर कोसळून एका चिमूरडीचा मृत्यू झाला आहे. तिच्या या मृत्यूला एक चिंधीवाला जबाबदार आसल्याचे समोर आले आहे. सिसिटीव्हीच्या फुटेजमधून चिंध्या गोळ्या करणाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडल्याचे समोर आले.

तीन वर्षांची चिमूरडी रस्त्यावरून धावत जात असताना तिच्या अंगावर हा स्पीकर कोसळला. सिसिटीव्ही फुटेज नुसार,चिंध्या गोळ्या करणाऱ्याच्या डोक्यावर असलेलं गाठोड स्पीकरच्या वायरमध्ये अडकून तो स्पीकर त्या मुलीच्या अंगावर पडून ती गंभीर जखमी झाली. मात्र उपचरसाठी रुग्णालयात दाखल करण्याच्या आतच तिचा मृत्यू झाला.

या घटनेची विक्रोळी पोलिस ठाण्याकडून दखल घेण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तर दुसरीकडे पुण्यात देखील आपघातांची मालिका सुरूच आहे. या अपघातात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पाषाण, पुणे - सोलापूर महामार्ग आणि मुंबई - बेंगळुरू मार्ग या परिसरांत हे अपघात घडले आहेत.

पाषाण परिसरात भरधाव वाहनाच्या धडकेत एका ७३ वर्षीय ज्येस्ष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे. अतुल विजयकुमार पाटील यांनी या घटनेची तक्रार चतु:शृंगी पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. त्यानुसार पोलिसांनी त्या वाहनचालकावर गुन्हा दाखल केला आले. हा अपघात शनिवार २४ जानेवारी रोजी सकाळी घडला.

दुसरी घटना मुंबई - बेंगळुरू मार्गावर घडली. रस्त्यात थांबलेल्या ट्रकवर मोटार आदळून हा अपघात घडला. भीमा राजेंद्र जाधव असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून शुभम डुबळे असे मोटारचालकाचे नाव आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून त्यानुसार ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार शुभम आणि त्याचा मित्र भीमा हे दिवे घाट परिसरातील श्री कानिफनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. आंबेगाव परिसरातील बाबाजी पेट्रोल पंपासमोर रस्त्याच्या कडेला ट्रक थांबला होता. ट्रक चालकाने पाठीमागील दिवे सुरू ठेवले नव्हते. रस्त्यात अंधारात थांबलेला ट्रक मोटारचालक शुभम याला दिसला नसल्याने त्या ट्रकवर माेटार आदळून मोटारचालक शुभम आणि त्याचा मित्र भीमा हे जखमी झाले. मात्र भीमा याचा मृत्यू झाला.

Comments
Add Comment