Pandhapur Accident: मुंबईवरुन विठुरायाच्या दर्शानासाठी रवाना झालेल्या भाविकांच्या गाडीचा भंयकर अपघात; चौघांचा दुर्दैवी मृत्यु

पंढरपूर : मुंबईहून विठ्ठलाच्या दर्शनासाठी रवाना झालेल्या भाविकांच्या गाडीचा भंयकर अपघाताची घटना मंगळवेढ्याजवळ येथे घडली आहे.या झालेल्या भीषण अपघातात चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या भीषण अपघातात १४ वर्षाची लहान मुलीसह तीन महिलांचा ही समावेश आहे व पाच ते सहा भाविक गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात सोमवार, २६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता पंढरपूर–सोलापूर महामार्गावर मंगळवेढ्याजवळील शरद नगर, मल्लेवाडी परिसरात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणारे भाविक क्रुझर गाडीने मंगळवेढा मार्गे जात होते. याच दरम्यान ढेकळेवाडी गावाजवळ समोरून येणाऱ्या एका कंटेनर ट्रकने भरधाव वेगात व चुकीच्या दिशेने येत क्रुझर जीपला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेमुळे क्रुझर गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात योगिनी केकाणे, सोनम अहिरे, आदित्य गुप्ता आणि सविता गुप्ता यांचा जागीच मृत्यू झाला. तर अंजली यादव, सोहम घुगे यांच्यासह इतर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने मंगळवेढा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

अपघाताची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, मात्र पोलिसांनी ती लवकरच सुरळीत केली. अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनर ट्रकचा क्रमांक hh ४६ bu-६६५१ असून चालक युवराज यशवंत गळवे याच्यावर निष्काळजीपणे वाहन चालविल्याचा आरोप आहे. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळात वर्णी लागणार?

मुंबई : भाजपच्या पक्षसंघटनेची सर्वोच्च आणि सर्वशक्तिशाली समिती असणाऱ्या संसदीय मंडळात लवकरच काही बदल केले

Mumbai Onion Price Hike : मुंबईत कांद्याचा भडका! कांद्याच्या दरवाढीमुळे गृहिणींचे गणित बिघडले; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राजधानी मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर (Onion Price Hike) अचानक गगनाला

Amravat Fire news : 'बाळ गेल्याचं आईला कसं सांगू ?' अमरावती घटनेतील मृत बाळाच्या पित्याच्या काळीज पिळवटणारा सवाल

अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक

Pune Viarl Video : बाईई... काय हा घाणेरडा प्रकार! महागड्या बेकरीमधून पेस्ट्री मागवली अन् निघाली.....

पुणे : नामांकित बेकरी किंवा हॉटेलमधून खाद्यपदार्थ घेताना ग्राहकांकडून स्वच्छता आणि गुणवत्तेची अपेक्षा केली

NIA Raid : देशविरोधी सायबर हल्ल्याचे धागेधोरे थेट महाराष्ट्रात! NIA ची जुन्नरमध्ये मोठी कारवाई; 'ती' माहिती समोर येताच खळबळ

पुणे : ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या वेबसाइट्सवर झालेल्या कथित सायबर हल्ल्याच्या

MHADA Pune Lottery : प्रतीक्षा संपली! पुणे अन् पिंपरीत म्हाडाचे घर अवघ्या १३ लाखांत; जाणून घ्या ठिकाणे आणि अर्ज करण्याची पद्धत!

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे.