Tuesday, January 27, 2026

राजापुरात जि.प. गटातून चार जणांची तर पंचायत समिती गणातुन १६ जणांची माघार

राजापुरात जि.प. गटातून चार जणांची तर पंचायत समिती गणातुन १६ जणांची माघार

राजापूर : :राजापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीकरीता मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी पंचायत समिताच्या १२ गणातून १६ उमेदवारांनी तर जिल्हा परिषदाच्या ६ गटातून चार उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. जुवाठी जि.प. गटातुन दीपक बेंद्रे यांनी तर धोपेश्वर पंचायत समिती गणातुन अरविंद लांजेकर यांनी आमदार निलेश राणे व आमदार किरण सामंत यांच्या विनंतीला मान देत आपले अर्ज मागे घेतले आहेत.

राजापूर तालुक्यात वडदहसोळ, जुवाठी, धोपेश्वर, साखरीनाटे व कातळी या सहा जिल्हा परिषद गट व वडदहसोळ, रायपाटण, तळवडे, ताम्हाणे, केळवली, जुवाठी, धोपेश्वर, पेंडखळे, नाटे, साखरीनाटे, अणसुरे व कातळी या बारा पंचायत समिती गणाकरीता निवडणूक होत आहे. या निवडणुकीकरीता जिल्हा परिषदाया सहा गटांसाठी १९ तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ५२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. या अर्जांची छाननी होऊन जिल्हा परिषद गणातील १७ अर्ज वैध तर पंचायत समिती गणातील ४९ अर्ज वैध ठरविण्यात आले होते.

दरम्यान,उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्हा परिषद वडदहसोळ गटातून संदिप कोलते, जुवाठी गटातून दीपक बेंद्रे, अनाजी गोटम तर साखरीनाटे गटातून श्वेता कोठारकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता वडदहसोळ जिल्हा परिषद गटातून राजेश चव्हाण (उबाठा ),प्रतीक मटकर (शिवसेना), तळवडे गटातून समिक्षा चव्हाण (उबाठा), सिध्दाली मोरे (शिवसेना), जुवाठी गटातून दिनेश जैतापकर (उबाठा), रमेश सूद (शिवसेना), धोपेश्वर गणातून प्रकाश कुवळेकर (शिवसेना),अभिजीत तेली (उबाठा),साखरीनाटे गटातून कोमल नवाळे (शिवसेना), नलिनी शेलार (उबाठा ), कातळी गटातून सोनाली ठुकरूल (शिवसेना), लक्ष्मी शिवलकर (उबाठा),सावित्री कणेरी (अपक्ष) यांच्यामध्ये लढत होणार आहे.

तालुक्यातील १२ पंचायत समिती गणातून तब्बल १७ उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यामध्ये वडदहसोळ - सुनील म्हादये, अनिल गुरव, रायपाटण - शंकर पटकारे, संदिप कोलते, तळवडे - स्नेहा नारकर, ताम्हाणे-मधुरा सुतार, केळवली - वैष्णवी कुळये, पभावती कानडे, धोपेश्वर - अरविंद लांजेकर, विलास गुरव, पेंडखळे - सुनील जठार, प्रफुल्ल सुर्वे, साखरीनाटे - आश्विनी शेगुलकर, कातळी - अक्षयकुमार कार्शिंगकर, सुहास कुवरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता वडदहसोळ गणातून विनोद शिंदे (उबाठा), राजेश पवार (मनसे), गौतम जाधव (शिवसेना), रायपाटण गणातून उमेश पराडकर (शिवसेना), विश्वनाथ लाड (उबाठा), तळवडे गटातून भामिनी सुतार (उबाठा), अपेक्षा मासये (शिवसेना), ताम्हाणे गणातून समिक्षा वाफेलकर (शिवसेना), योगी डांगे (उबाठा),केळवली गणातून भाग्यश्री लाड (शिवसेना), छाया कोकाटे (उबाठा), जुवाठी गणातून प्रकाश भिवंदे (अपक्ष), दिवाकर मयेकर (उबाठा), प्रसाद मोहरकर (शिवसेना), धोपेश्वर गणातून अभिजीत गुरव (भाजपा), कृष्णाजी नागरेकर (उबाठा), सिध्देश मराठे (काँग्रेस), योगेश नकाशे (अपक्ष), पेंडखळे गणातून राजेश गुरव (शिवसेना), गणेश बाईंग (उबाठा ), पणाली माळी (अपक्ष), नाटे गणातून सुवर्णा बांदकर (भाजपा), नमिता नागले (उबाठा), नंदिनी कदम (अपक्ष), साखरीनाटे गणातून अलमिनाब म्हसकर (काँग्रेस), स्पृहा गुरव (शिवसेना), अणसुरे गणातून दिपाली मेढेकर (उबाठा), जान्हवी गावकर (शिवसेना), कातळी गणातून पंढरीनाथ मयेकर (शिवसेना), अजय कार्शिंगकर (उबाठा) यांच्यामध्ये लढत होणार आहे.

मांडकी गणातून माघार घेत अपक्ष उमेदवार प्रमोद खेडेकर यांचा शिवसेनेत प्रवेश जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या धामधुमीत मंगळवारी मांडकी पंचायत समिती गणाचे अपक्ष उमेदवार प्रमोद खेडेकर यांनी माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून थेट शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. चव्हाण यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. मांडकी गणातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेऊन सावर्डे गटातील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय होऊ, असे खेडेकर यांनी यावेळी सांगितले. सावर्डे जिल्हा परिषद गटातील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. या गटात शिवसेकडून माजी सभापती धनश्री शिंदे तर राष्ट्रवादीकडून आ. शेखर निकम यांच्या पत्नी माजी सभापती पूजा निकम आमने सामने आहेत. दोन माजी सभापतींमधील ही लढत चांगलीच लक्षवेधी ठरते आहे. तर सावर्डे पं.स.गणातून माजी उपसभापती युवराज राजेशिर्के तर मांडकी गणातून विद्यमान सरपंच अनंत खांबे लढत आहेत. शिवसेना उपनेते माजी आ. सदानंद चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारांच्या भेटी घेत त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा धडाका लावला. अनंत खांबे यांच्यासारख्या एका होतकरू कार्यकर्त्यांच्या विजयाचे शिल्पकार होण्याची सदानंद चव्हाण यांनी केलेली विनंती मान्य करून प्रमोद खेडेकर यांनी सदानंद यांच्या नेतृत्वाखाली थेट शिवसेनेत जाहीर प्रवेश केला व मांडकी गणातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >