Tuesday, January 27, 2026

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट; ११ जवान जखमी

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट; ११ जवान जखमी

बिजापूर/रायपूर : रविवारी २५ जानेवारीला छत्तीसगडमधील बिजापूरच्या उसुर पोलीस स्टेशन परिसरात आयईडी स्फोट झाला. इथे सुरक्षा दलांचे नक्षलविरोधी ऑपरेशन सुरू होते . ऑपरेशन सुरू असताना कर्रेगुट्टाच्या जंगलात नक्षलवाद्यांनी पेरलेल्या आयईडीचा स्फोट झाला. या दुर्घटनेत सुरक्षा दलांचे ११ जवान जखमी झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, या नंतर जखमी जवानांना उपचारासाठी विमामनं रायपूरला नेण्यात आले. जखमींवर रायपूरच्या रामकृष्ण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत डॉ. पंकज धबालिया यांनी दुजोरा दिला आहे.

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त जिल्हा बिजापूरमध्ये सुरक्षा दलांचे नक्षलविरोधी ऑपरेशन सुरू असताना अचानक स्फोट झाला. या कारवाईत जिल्हा राखीव रक्षक (DRG) आणि बस्तर फायटर्सचे जवान सहभागी होते. याशिवाय, रिझोल्युट अॅक्शन कोब्रा सीआरपीएफच्या कमांडो बटालियनची टीम देखील सहभागी होती. या स्फोटात ११ जवान जखमी झाले, ज्यामध्ये डीआरजीचे १० आणि कोब्रा बटालियनच्या एका जवानाचा समावेश आहे.

रामकृष्ण रुग्णालयाचे डॉ. पंकज धबालिया यांनी सांगितलं की, "आयईडी स्फोटात जखमी झालेल्या ११ जवानांना रायपूरमधील रामकृष्ण रुग्णालयात आणण्यात आलं. एका जवानाला प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तर ११ जवानांवर अजूनही रामकृष्ण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यापैकी चार ते पाच जण गंभीर जखमी आहेत आणि काही जवानांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे." या संपूर्ण घटनेनंतर आयईडी स्फोटात जखमी झालेल्या सर्व 11 जवानांना काल रात्री उशिरा लष्कराच्या एमआय-17 हेलिकॉप्टरनं रायपूर इथं चांगल्या उपचारांसाठी नेण्यात आलं. रामकृष्ण रुग्णालयातील डॉक्टरांच्या मते, सर्व जखमी जवान धोक्याबाहेर आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबवली आहे. तसंच अलर्ट जारी करण्यात आला.

नोव्हेंबर २०२५ मध्ये, सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या कर्रेगुट्टा येथील उसुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या तडपाला गावात एक छावणी उभारली होती. एप्रिल-मे २०२५ मध्ये, केंद्रीय आणि राज्य सुरक्षा दलांनी कर्रेगुट्टा टेकड्यांच्या सभोवतालच्या घनदाट जंगलात २१ दिवसांची मोठी कारवाई केली, ज्यामध्ये ३१ नक्षलवादी ठार झाले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर २०२५ मध्ये, सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान मानल्या जाणाऱ्या कर्रेगुट्टा येथील उसुर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या तडपाला गावात एक छावणी उभारली होती. एप्रिल-मे २०२५ मध्ये, केंद्रीय आणि राज्य सुरक्षा दलांनी कर्रेगुट्टा टेकड्यांच्या सभोवतालच्या घनदाट जंगलात २१ दिवसांची मोठी कारवाई केली, ज्यामध्ये ३१ नक्षलवादी ठार झाले होते. या कारवाईत ३५ शस्त्रे,४५० आयईडी आणि मोठ्या प्रमाणात डिटोनेटर, स्फोटके आणि वैद्यकीय साहित्य, विद्युत उपकरणं आणि नक्षलवादी साहित्यासह इतर साहित्य जप्त केलं होतं

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >