मुंबई: महिलांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत, राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये माननीय राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत.
या अभिनव उपक्रमाला राज्यभरातील महिलांकडून मोठ्या प्रमाणावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, महिलांनी समाधान व कृतज्ञता व्यक्त केली आहे.
मेनोपॉज म्हणजे महिलांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा व संवेदनशील टप्पा.
या काळात होणारे शारीरिक बदल, मानसिक ताण, हॉर्मोनल असंतुलन, हाडांचे आजार, झोपेचे विकार व नैराश्य याकडे आजवर दुर्लक्ष होत होते.
हीच गरज ओळखून राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी महिलांसाठी विशेष ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला.
या क्लिनिकच्या माध्यमातून
✔ तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला
✔ मानसिक आरोग्य समुपदेशन
✔ हाडे, हृदय व हॉर्मोन तपासणी
✔ औषधोपचार व मार्गदर्शन
एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
महत्वाची बाब म्हणजे,
👉 देशात प्रथमच अशा प्रकारचे मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.
महिलांच्या आरोग्याबाबत महाराष्ट्राने घेतलेले हे पाऊल इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
मकरसंक्रांतीनिमित्त महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून,
खऱ्या अर्थाने महिलांच्या आरोग्याची गोड भेट
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सर्व महिलांना दिली आहे, अशी भावना महिलांकडून व्यक्त होत आहे.
या उपक्रमाबद्दल
संवेदनशील महिला, आरोग्यदृष्टी असलेले नेतृत्व व धाडसी निर्णय
यासाठी महिलांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे कौतुक केले असून,
त्यांच्याप्रती आभार देखील व्यक्त केले आहेत.
माननीय राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचे कोटेशन:
“मेनोपॉज हा आजार नाही, तर महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे.
मात्र या टप्प्यात महिलांना शारीरिक आणि मानसिक आधाराची अत्यंत गरज असते.
राज्यातील प्रत्येक महिलेला या काळात योग्य सल्ला, उपचार आणि सन्मान मिळावा,
यासाठीच मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत.
महिलांचे आरोग्य मजबूत झाले, तर कुटुंब, समाज आणि राज्य नक्कीच सक्षम होईल.”