Tuesday, January 27, 2026

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांची निवडणूक रणनिती यशस्वी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांची निवडणूक रणनिती यशस्वी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये ४२ जागांसाठी निवडणूक; ११६ जणांची माघार, ११५ उमेदवार रिंगणात

जिल्ह्यातील ८ पंचायत समितीमध्ये ८३ जगांसाठी निवडणूक, १५४ जणांचची माघार, ३५९ उमेदवार रिंगणात

सिंधुनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी आणि पंचायत समितीच्या १०० जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक होत असून होत असून या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मंगळवारी अखेरच्या दिवशी ११६ एवढ्या जिल्हा परिषद तर १५४ एवढ्या पंचायत समिती सदस्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. या निवडणुकीच्या पूर्वीच भारतीय जनता पक्षाने करिष्मा केला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सात जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समिती सदस्य बिनविरोध करण्यात यश मिळाले तर शिंदे गटाचा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यामध्ये प्रत्येकी एक सदस्य बिनविरोध झाला आहे.

तब्बल नऊ वर्षानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील आठही पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. त्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे तर सात फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मंगळवार २८ जानेवारी अंतिम तारीख होती.या दिवसापर्यंत जिल्हा परिषदेसाठीच्या एकूण पन्नास जागांसाठी पात्र ठरलेल्या २३१उमेदवारांपैकी ११६ एवढ्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत आणि पंचायत समित्यांसाठी वैध ३९८ पैकी १५४ एवढ्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या ५० जागांपैकी ८जागा बिनविरोध होऊन शिल्लक राहिलेल्या ४२ जागांसाठी ११५ एवढे उमेदवार रिंगणात राहिले आहेत तर पंचायत समितीच्या एकूण शंभर जागांपैकी १७ जागा बिनविरोध झाल्याने ८३ जागांसाठी २४४ एवढे उमेदवार रिंगणात आहेत ही सर्व स्थिती पाहता काही ठराविक मतदारसंघ वगळता बाकी सर्व ठिकाणी दुहेरी लढत निश्चित झाली आहे. आता या दुहेरी लढतीमध्ये मतदार कोणाला पसंती दाखवतात हे ७ फेब्रुवारीलाच समजणार आहे. मात्र, निवडणूक होण्यापूर्वीच महायुतीने एकूण १५० उमेदवारांपैकी २५ उमेदवार बिनविरोध निवडून आणत आपली ताकद दाखवली आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांची निवडणूक रणनिती

५० सदस्य असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत भाजपचे ७ सदस्य तर शिवसेनेचा ( शिंदे) एक असे जिल्हा परिषदेत एकूण ८ उमदेवार बिनविरोध झाले. तर शंभर पंचायत समिती सदस्यांमधून भाजपचे १६ सदस्य बिनविरोध झाले आहेत आणि शिंदे शिवसेनेचा एक सदस्य बिनविरोध असे एकूण १७ सदस्य बिनविरोध झालेला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या नियोजनबद्ध निवडणूक रणनीतीमुळे सर्वाधिक जागा बिनविरोध झाल्या आहेत.

बिनविरोध झालेल्या जिल्हा परिषद सिंधुदुर्ग( बिनविरोध )

१) खारेपाटण; प्राची इस्वलकर(भाजप) २)बांदा; प्रमोद कामत (भाजप) ३)जाणवली; रुहिता राजेश तांबे ( शिंदे शिवसेना) ४)पडेल ;सुयोगी रविंद्र घाडी (भाजप) ५)बापर्डे ;अवनी अमोल तेली (भाजप) ६) पोंगुर्ले; अनुराधा महेश नारकर (भाजप) ७)किंजवडे-सावी गंगाराम लोके (भाजप) ८) कोळपे; प्रमोद पुंडलिक रावराणे (भाजप) पंचायत समिती कणकवली( ६ बिनविरोध) १)वरवडे ; सोनू सावंत (भाजप) २)नांदगाव; हर्षदा हनुमंत वाळके (भाजप) ३) जाणवली महेश्वरी महेश चव्हाण (भाजप) ४) बिडवाडी; संजना संतोष राणे (भाजप) ५) हरकुळ बुद्रुक; दिव्या दिनकर पेडणेकर (भाजप) ६) नाटळ ; सायली संजय कृपाळ (भाजप)

देवगड तालुक्यातील पंचायत समिती(६ बिनविरोध)

१)पडेल –अंकुश यशवंत ठूकरूल (भाजप) २)नाडण –गणेश सदाशिव राणे (भाजप) ३)बापर्डे – संजना संजय लाड (भाजप) ४) फणसगाव - समृद्धी संतोष चव्हाण (भाजप) ५) शिरगाव - शितल सुरेश तावडे (भाजप) ६) कोटकामते -ऋतुजा राकेश खाजनवाडकर (भाजप)

पंचायत समिती वैभववाडी( बिनविरोध)

कोकिसरे; सौ.साधना सुधीर नकाशे (भाजप) पंचायत समिती वेंगुर्ले (बिनविरोध) आसोली; संकेत धुरी (भाजप) मालवण पंचायत समिती ( बिनविरोध) अडवली मालडी; सीमा सतीश परुळेकर (भाजप) सावंतवाडी पंचायत समिती (बिनविरोध) शेरले; महेश धुरी (भाजप) दोडामार्ग पंचायत समिती (बिनविरोध) कोलझर; गणेश प्रसाद गवस (शिंदे सेना)

कोळपे जि. प. मध्ये भाजपाचे प्रमोद रावराणे बिनविरोध

कोळपे जिल्हा परिषद मतदारसंघातील उबाठाचे उमेदवार जितेंद्र तळेकर हे भाजपाच्या गळाला लागले. त्यांनी या निवडणूकित नांगी टाकत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे अधिकृत उमेदवार प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड झाली. प्रमोद रावराणे यांची बिनविरोध निवड होताच भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष व्यक्त केला जात आहे. या मतदारसंघात उबाठाच्या सुनिल नारकर यांचा अर्ज छानणीत बाद झाला होता. तर दुसरे उमेदवार जितेंद्र तळेकर यांनी अर्ज मागे घेतला. त्याचप्रमाणे भाजपाच्या डमी उमेदवार राजेंद्र राणे, अनंत फोंडके,अतुल सरवटे यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे एकमेव उमेदवार असलेले प्रमोद रावराणे बिनविरोध झाले आहेत. या अगोदर कोकिसरे पंचायत समितीच्या भाजपच्या उमेदवार साधना नकाशे बिनविरोध ठरल्या. त्यामुळे उबाठाला धक्यावर धक्के बसत आहेत. तर भाजपचा विजयाचा वारू सुसाट सुटला असून भाजप कार्यकर्ते जल्लोष करीत असून उबाठा सेनेत सन्नाटा पसरला आहे.

आज उद्याही नितेश साहेबांसोबत ..... संतोष कानडे यांच्या स्टेटसला लागलेले पोस्टर व्हायरल... अपक्ष उमेदवारी घेतली मागे

भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांनी फोंडाघाट, हरकुळ खुर्द उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी आज शेवटच्या दिवशी माघार घेतली. कानडे यांनी आपल्या व्हॉटसअप स्टेट्सला काल, आज उद्याही नितेश साहेबांसोबत .. अशा आशयाचे स्टेटस ठेवले आहे. संतोष कानडे यांच्या व्हाट्सअप स्टेटसमध्ये खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबतचे फोटो असून दाखवाल ती दिशा.. सांगाल तो मार्ग.. द्याल ती जबाबदारी.. शब्द ही भावना होती. निष्ठा ही श्रद्धा आहे. काल आज उद्याही नितेश साहेबांसोबत असा मजकूर आहे. फोंडाघाट आणि हरकुळ जि प मतदारसंघात कानडे यांनी अपक्ष उमेदवारी देखील दाखल केली होती. या दोन्ही अपक्ष उमेदवारी अर्ज माघार घेतली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >