पनवेल : नांदाई माता मच्छिमार सहकारी संस्था कोंबडभुजे आणि राधा राम मच्छिमार सहकारी संस्था खारकोपर या मच्छिमारांच्या संघटनेने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमधील गव्हाण जिल्हा परिषद आणि गव्हाण व वहाळ पंचायत समितीच्या भाजप महायुतीच्या उमेदवारांना आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. या संदर्भातील पाठिंबा पत्र नांदाई माता मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष सतीश रमेश कोळी व राधा राम मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष नामदेव ठाकूर यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, वहाळ साईबाबा मंदिरचे प्रमुख रविंद्र पाटील, विभागीय अध्यक्ष विजय घरत, निलेश खारकर, संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. गव्हाण जिल्हा परिषद गटातून निकिता निलेश खारकर, वहाळ गणामध्ये वितेश त्रिंबक म्हात्रे तर गव्हाण गणातून जिज्ञासा मनोहर कोळी भाजप महायुतीचे उमेदवार आहेत. या उमेदवारांना नांदाई माता आणि राधा राम मच्छिमार सहकारी संस्थांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.