पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे. विशेषतः विवाहित महिलांना सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाचे प्रमाण वाढले असून, दोन भीषण घटनांनी समाजमन सुन्न झाले आहे. हुंडा आणि मानसिक छळाचा बळी पुण्यातील तरुण इंजिनीअर दीप्ती चौधरी हिने सासरच्या जाचाला कंटाळून आपले आयुष्य संपवले. उच्चशिक्षित असूनही तिला सासरच्यांकडून होणारा छळ सहन करावा लागला, हे या घटनेचे सर्वात दुर्दैवी पैलू आहे. माणुसकीला काळिमा फासणारा प्रकार नाशिकमध्ये एका पतीने आपल्या पत्नीला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर तिला बळजबरीने विषारी औषध पाजले. धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीची प्रकृती खालावल्यावर तिला रुग्णालयात दाखल करून नवरा तिथून पसार झाला आहे. सध्या पीडितेवर उपचार सुरू असून तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली आहे.
पंढरपूर : मुंबईहून विठ्ठलाच्या दर्शनासाठी रवाना झालेल्या भाविकांच्या गाडीचा भंयकर अपघाताची घटना मंगळवेढ्याजवळ येथे घडली आहे.या झालेल्या भीषण ...
नाशिकमध्ये उच्चशिक्षित विवाहितेला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातील इंजिनीअर दीप्ती चौधरीच्या आत्महत्येची जखम ताजी असतानाच, नाशिकमधूनही अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महिमा मॉन्टी राजदेव या उच्चशिक्षित विवाहितेवर सासरच्या मंडळींनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप होत आहे. महिमा आणि मॉन्टी राजदेव यांचा एप्रिल २०२५ मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र, सुरुवातीपासूनच या विवाहाला सासरच्या लोकांचा विरोध होता की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कुटुंबात झालेल्या वादानंतर महिमाला घरी बोलावण्यात आले. तिथे तिला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर बळजबरीने विषारी औषध पाजून तिला संपवण्याचा प्रयत्न झाला. प्रेमविवाह केल्यामुळेच सासरच्या मंडळींकडून महिमाचा सातत्याने छळ केला जात होता आणि याच छळातून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.
विष पाजून पतीचा रुग्णालयातून पळ...
नाशिकच्या महिमा राजदेव प्रकरणात आता माहेरच्यांनी केलेल्या आरोपांमुळे या छळाचे भीषण स्वरूप समोर आले आहे. भद्रकाली पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली असून, समोर आलेले मुद्दे सुन्न करणारे आहेत. महिमाच्या सासरच्यांनी तिच्यावर चोरीचा खोटा आक्षेप घेतला होता. या बहाण्याने चक्क तिच्या बेडरूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते, असा खळबळजनक दावा महिमाच्या आईने केला आहे. हा तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावरचा मोठा घाला मानला जात आहे. लग्नाला केवळ आठ महिने झाले असतानाच सासू, सासरे आणि दीर यांच्याकडून तिचा सतत छळ सुरू होता. मारहाण करून विष पाजल्यानंतर पतीने महिमाला जिल्हा रुग्णालयात दाखल तर केले, मात्र कारवाईच्या भीतीने तो तिथून फरार झाला आहे. विषारी औषध शरीरात गेल्यामुळे महिमाची प्रकृती सध्या अत्यंत गंभीर असून ती मृत्यूशी झुंज देत आहे.





