Tuesday, January 27, 2026

Bank Strike: बँकांचा आज देशव्यापी संप; ‘या’ बँका राहणार बंद

Bank Strike: बँकांचा आज देशव्यापी संप; ‘या’ बँका राहणार बंद

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने देशभरातील बँक कर्मचाऱ्यांच्या (Bank Strike) ५ दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या मागणीसाठी २७ जानेवारी २०२६ रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे देशभरातील विशेषतः सार्वजनिक क्षेत्रातील (पब्लिक सेक्टर) बँकांच्या शाखांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे आणि अनेक बँका बंद राहू शकतात. ८ मार्च २०२४ रोजी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनियन यांच्यात वेतन सुधारणा करारावर स्वाक्षरी झाली होती.या संयुक्त नोटमध्ये सर्व शनिवारी सुट्टी देण्यावर सहमती दर्शवण्यात आली होती. परंतु त्यांना सुट्ट्या ह्या न मिळाल्यामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी २७ जानेवारी रोजी बँक कर्मच्याऱ्यांनी संप पुकारला आहे. या संपामुळे महाराष्ट्रासह देशभरातील बँकिंग सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. देशभरातील प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) या नऊ संघटनांच्या संयुक्त मंचाने या संपाचे आवाहन केले आहे. मार्च २०२४ मध्ये झालेल्या करारात मान्य होऊनही '५ दिवसांचा आठवडा' अद्याप लागू न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

संपाचे मुख्य कारण

पाच दिवसांचा आठवडा ही बँक कर्मचाऱ्यांची ही मागणी २०१५ पासून प्रलंबित आहे.प्रत्येक शनिवारी बँकांना सुट्टी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या विलंबाचा निषेध म्हणून आणि पाच दिवस काम, दोन दिवस सुट्टी लागू करण्यासाठी हा एकदिवसीय संप पुकारण्यात आला आहे. सध्याच्या नियमांनुसार, बँक कर्मचाऱ्यांना दर महिन्याचा दुसरा आणि चौथा शनिवार सुट्टी असते. सर्व शनिवारी सुट्टी देऊन आठवड्यात केवळ ५ दिवस काम असावे. ५ दिवसांचा आठवडा केल्यास कर्मचारी दररोज ४० मिनिटे अतिरिक्त काम करण्यास तयार आहेत, जेणेकरून कामाच्या तासांचे नुकसान होणार नाही.

Bank Strike: बँकांचा आज देशव्यापी संप;‘या’बँका राहणार बंद

या संपात स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक यांसारख्या सर्व प्रमुख सरकारी बँकांचा समावेश आहे. खासगी बँकांचे कामकाज सुरू राहण्याची शक्यता असली तरी, चेक क्लिअरन्स यांसारख्या सेवांवर सरकारी बँकांच्या संपामुळे परिणाम होऊ शकतो. ८ मार्च २०१४ रोजी इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) आणि युनियन यांच्यात वेतन सुधारणा करारावर स्वाक्षरी झाली होती. या संयुक्त नोटमध्ये सर्व शनिवारी सुट्टी देण्यावर सहमती दर्शवण्यात आली होती. मात्र, वित्तीय सेवा विभागाकडून (DFS) याला अद्याप हिरवा कंदील मिळालेला नाही. गेल्या ९ महिन्यांपासून सरकारकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने युनियनने संपाचे हत्यार उपसले आहे.

ग्राहकांसाठी महत्त्वाच्या टिप्स

२७ जानेवारीला बँकांचे व्यवहार बंद राहतील, त्यामुळे चेक जमा करणे किंवा मोठे रोख व्यवहार आधीच करून घ्या. संपाच्या काळात नेट बँकिंग, यूपीआय (UPI) आणि मोबाईल बँकिंग सेवा सुरू राहतील. संपाच्या काळात एटीएममधील रोख रकमेचा तुटवडा जाणवू शकतो, त्यामुळे आवश्यक रोकड आधीच काढून ठेवा.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा