Tuesday, January 27, 2026

जागतिक अस्थिरतेत चांदीचा नवा ऐतिहासिक विक्रम! २००८ जागतिक मंदीनंतर चांदीच्या दरात सर्वाधिक वाढ एक दिवसात ८% उसळली

जागतिक अस्थिरतेत चांदीचा नवा ऐतिहासिक विक्रम! २००८ जागतिक मंदीनंतर चांदीच्या दरात सर्वाधिक वाढ एक दिवसात ८% उसळली

मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत व युरोपियन युनियन यांच्यातील द्विपक्षीय करार झाला असताना दुसरीकडे इराण आणि युएस यांच्यातील अस्पष्टता कायम राहिल्याने एकूणच युएस व जागतिक गुंतवणूकदार साशंक राहिल्याने आज चांदीच्या दरात नवा ऐतिहासिक उच्चांक गाठला गेला आहे. म्हणजेच २००८ जागतिक मंदी असलेल्या दरानंतर आज प्रथमच ऐतिहासिक वाढ झाल्याने चांदीने नवी रेकॉर्ड ब्रेक वाढ नोंदवली आहे. 'गुडरिटर्न्स' संकेतस्थळावरील माहितीनुसार, चांदीच्या प्रति ग्रॅम दरात १० रूपयाने, प्रति किलो दरात १०००० रूपयाने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रति ग्रॅम चांदी ३७० रूपयांवर, प्रति किलो चांदी ३७०००० रूपयांवर पोहोचली आहे. संकेतस्थळावरील माहितीनुसार, मुंबईसह प्रमुख शहरातील चांदीचे सरासरी प्रति १० ग्रॅम दर ३७०० व प्रति किलो दर ३७००० रूपयांवर पोहोचले आहेत. भारतीय कमोडिटी बाजारातील एमसीएक्समध्ये (Multi Commodity Exchange MCX) चांदीचे दर थेट ८% उसळल्याने भारतीय सराफा बाजारात चांदीचे दर ३६१५५५ रूपयांवर पोहोचले.

जागतिक स्तरावर चांदीच्या सिल्वर फ्युचर निर्देशांकात संध्याकाळपर्यंत २.८९% घसरण झाली आहे. गेल्या पाच दिवसांत चांदीच्या दरात तुफान वाढ झाली आहे. आज दिवसभरात चांदीच्या किमतींमध्ये तुफान वाढ झाली आहे. जगभरात चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली असताना पुरवठ्यातील सततची कमतरता भासल्याने चांदीत तुफान वाढ झाली आहे.

दुसरीकडे ग्रीनलँडवरील अमेरिका-युरोप भूराजकीय संबंधांमधील बदलांमुळे अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्याने आणि युरोप आपल्याकडील अमेरिकन मालमत्तेचा मोठा साठा वापरू शकतो या चिंतेमुळे, गुंतवणूकदारांची प्रत्यक्ष मालमत्तेतील गुंतवणूक करण्याची इच्छा वाढली. पुढील आठवड्यात फेडरल रिझर्व्ह व्याजदर बँक अपरिवर्तित ठेवेल का या चिंतेने गुंतवणूकदारांमध्ये अस्पष्टता आहे.दुसरीकडे वर्षाच्या उत्तरार्धात दोन संभाव्य व्याजदर कपातींच्या बाजारातील अंदाजामुळे सोन्याचांदीला आणखी आधार मिळाला आहे. युएस राष्ट्राध्यक्ष ट्रम्प अधिक उदारमतवादी फेड अध्यक्षांची नियुक्ती करू शकतात या अटकळांमुळेही व्याजदर कपातीच्या अपेक्षा वाढल्या असे तज्ञांनी स्पष्ट केले.

अनिश्चिततेमुळे रिटेल अथवा किरकोळ गुंतवणूकदारांचा सहभाग वाढवल्याने ईटीएफ गुंतवणूकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. युएस मध्ये तिसऱ्या तिमाहीत अमेरिकेचा जीडीपी वार्षिक ४.४% च्या मजबूत गतीने वाढला. दुसरीकडे गुंतवणुकीची मागणी, कमकुवत डॉलर आणि पुरवठा-मागणीतील संरचनात्मक तूट लक्षात घेऊन दीर्घकालीन किमतींचे अंदाज वाढवले गेले असताना गुंतवणूकदारांनी भावना प्रधान होऊन मोठा कौल सोन्याचांदीच्या दरात दर्शवला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा