मोहित सोमण: आज भारत व ईयु यांच्यातील करारानंतर अखेरच्या सत्रात शेअर बाजाराने बाजी पालटली आहे. त्यामुळे इक्विटी बेंचमार्क निर्देशांकातील सकाळच्या घसरणीची जागा तेजीने घेतली असून शेअर बाजार अखेरच्या सत्रात सकारात्मक पातळीवर बंद झाला आहे. सेन्सेक्स ३१९.७८ अंकांनी उसळत ८१८५७.४८ पातळीवर व निफ्टी १२६.७५ अंकांने उसळत २५१७५.४० पातळीवर स्थिरावला आहे.सेन्सेक्स व निफ्टीत सकाळच्या सत्रातील अस्थिरतेची जागा स्थिरतेनी घेतल्याने बाजाराला आधाराभूत पातळी मिळणे सोपे झाले. प्रामुख्याने मजबूत तिमाही फंडा मेंटलमुळे बँकेच्या शेअरला गुंतवणूकदारांनी सकारात्मक कौल दिला. विशेषतः सकाळच्या सत्रातील १३% अस्थिरता निर्देशांक (VIX Volatility Index) हा १.८३% उसळणीवर घसरल्याने बाजाराला याचा निश्चितच फायदा झाला. आज निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात सर्वाधिक वाढ मेटल,प्रायव्हेट बँक, पीएसयु बँक,आयटी, फायनांशियल सर्विसेस २५/५० निर्देशांकात झाली असून सर्वाधिक घसरण मिडिया,ऑटो,एफएमसीजी,हेल्थकेअर निर्देशांकात झाली आहे. सकाळी घसरलेले मिड व स्मॉल कॅप शेअर्समध्ये वाढ झाल्याने बाजारात सेल ऑफ रोखले गेल्याचे स्पष्ट झाले.
आलं लार्ज कॅप शेअर्समध्येही वाढ झाल्याने दरपातळी उंचावली. तसेच जागतिक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर नवा इराण व युएस मधील ट्रिगर आला नसल्याने बाजाराला स्थिरता मिळण्यास मदत झाली. दरम्यान रूपया डॉलरच्या तुलनेत घसरत नव्या निचांकी स्तराजजवळ येऊन ठेपल्याने काही प्रमाणात बाजारातून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतली. युएस बाजारात डाऊ जोन्स वगळता दोन्ही शेअर बाजारात वाढ झाली तीच परिस्थिती युरोपियन बाजारात राहिल्याने युरोपात व आशियाई शेअर बाजारात एकही बाजारात घसरण झाली नाही. एकूणच टेक्निकल स्थिती खूप चांगली नसली तरी फंडामेंटली बाजाराने समाधानकारक स्थिती अस्थिरतेत नोंदवली आहे.
अखेरच्या सत्रात सर्वाधिक वाढ होम फर्स्ट फायनान्स (१२.४८%), करूर वैश्य बँक (१०.१९%), एजिस (९.५२%), जिंदाल स्टेन (८.५९%), एमसीएक्स (५.९६%) समभागात झाली असून सर्वाधिक घसरण वन सोर्स स्पेशालिटी (१९.६२%), एसबीएफसी फायनान्स (११.६७%), सिंजेन इंटरनॅशनल (९.९५%), जेएसडब्लू एनर्जी (७.८७%), ग्राविटा इंडिया (५.३९%), वालोर इस्टेट (४.६८%) समभागात झाली आहे.
आजच्या बाजारातील परिस्थितीवर विश्लेषण करताना अशिका इन्स्टिट्युशनल इक्विटीजने म्हटले आहे की,'सकारात्मक जागतिक संकेतांच्या आणि वॉल स्ट्रीटवरील रात्रभरातील तेजीच्या पाठिंब्याने भारतीय शेअर बाजारांनी मंगळवारच्या सत्राची सुरुवात उच्च पातळीवर केली, परंतु सत्राच्या अखेरीस बाजारात अस्थिरता दिसून आली. बेंचमार्क निफ्टी ५० २५०६३ अंकांवर उघडला, त्याने २५१८४ अंकांची इंट्राडे उच्चांकी पातळी गाठली, परंतु सत्रादरम्यान झालेल्या तीव्र चढ-उतारांमुळे तो २५९३२ पातळीच्या नीचांकी पातळीवर घसरला. भारत- युरोपियन युनियन मुक्त व्यापार कराराबद्दलचा आशावाद आणि अमेरिका भारताच्या रशियन तेलाच्या आयातीशी संबंधित शुल्कविषयक उपाययोजना शिथिल करू शकते या अपेक्षांमुळे बाजारातील भावनांना चालना मिळाली. या सकारात्मक वातावरणात भर घालत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारत-युरोपियन युनियन यांच्यातील एका महत्त्वपूर्ण मुक्त व्यापार कराराच्या निष्कर्षाची घोषणा केली. या करारामध्ये अशा अर्थव्यवस्थांचा समावेश आहे, ज्यांचा एकत्रित वाटा जागतिक जीडीपीच्या जवळपास एक चतुर्थांश आणि जागतिक व्यापाराच्या सुमारे एक तृतीयांश आहे. युरोपियन आयोगाच्या अध्यक्षांनी या कराराला एक ऐतिहासिक यश म्हटले आणि त्याचे वर्णन 'सर्व करारांची जननी' असे केले. त्यांनी नमूद केले की भारत आणि युरोपियन युनियन चाचेगिरीचा सामना करण्यासाठी संयुक्त नौदल सराव देखील करतील. या करारामुळे दोन्ही प्रदेशांमध्ये लाखो नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास आणखी वाढेल.
तथापि, हे सत्र जानेवारी २०२६ च्या मासिक डेरिव्हेटिव्ह्जच्या मुदतपूर्तीशी जुळल्यामुळे, बेंचमार्क निर्देशांकात दोन्ही बाजूंनी हालचालींसह तीव्र अस्थिरता दिसून आली. क्षेत्रीय आघाडीवर, धातू, कमोडिटीज, सीपीएसई, पीएसई आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शेअर्समध्ये खरेदीचा ओघ दिसून आला, तर मीडिया, ऑटो, रिअल्टी, एफएमसीजी आणि हेल्थकेअरच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव होता.'






