Tuesday, January 27, 2026

महाडमध्ये ३० उमेदवारी अर्ज मागे

महाडमध्ये ३० उमेदवारी अर्ज मागे

महाड : महाड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी एकु..ण २५ तर पंचायत समितीच्या १० जागांसाठी एकुण ४२ असे एकुण ६७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी एकुण ३० अर्ज मागे घेण्यात आले त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात ३७ उमेदवार आहेत. महाडमध्ये २७ जानेवारीला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ३० उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आले.

महाड तालुक्यातील बिरवाडी जि.प. गटात रिया रविंद्र घोलप यांनी अर्ज मागे घेतला. या गटात शिवसेनेकडून मंदा भागोजी ढेबे, राष्ट्रवादी काँग्रेस कडून पल्लवी प्रदीप बागडे, शिवसेना ठाकरे गटाकडून दिपाली सुभाष मोरे अशी तिरंगी लढत होणार आहे. धामणे पं स गणात ओंकार अनिल जाधव, गणेश खामकर यांनी अर्ज मागे घेतल्याने शिवसेनेचे अनिल जाधव हे बिनविरोध निवडून आले. बिरवाडी पं स गणात राजेश जाधव यांनी अर्ज मागे घेतला. या गणातशिवसेनेकडून लक्ष्मण वाडकर, राष्ट्रवादीकडून मयुर जाधव अशी दुरंगी लढत होणार आहे. खरवली जि.प.गटात रिया घोलप,पुर्वा सुर्वे यांनी अर्ज मागे घेतले. या गटात सेनेकडून मनाली काळीजकर, राष्ट्रवादीकडून निकीता सुतार अशी दुरंगी लढत होणार आहे. वरंध पं स गणात अश्विनी देशमुख,शालिनी साळुंखे,अमृता पांडे,विजया साळुंके यांनी अर्ज मागे घेतले. या गणात भाजपकडून अमृता पांडे,राष्ट्रवादीकडून सुप्रिया देशमुख,शिवसेनेकडून नुतन मोरे अशी तिरंगी लढत होणार आहे.

खरवली पं स गणात विद्या रेशीम,रेखा सकपाळ यांनी अर्ज मागे घेतले. या गणात शिवसेनेकडून दिव्या रेशीम, राष्ट्रवादीकडून नेहा सकपाळ अशी दुरंगी लढत होणार आहे. नडगांवतर्फे बिरवाडी जि प गटात रविंद्र तरडे,राधिका महाडीक,सुभाष खोपकर असे ३ अर्ज मागे घेतले. शिवसेनेकडून विकास गोगावले, राष्ट्रवादीकडून निलेश महाडिक अशी दुरंगी लढत होणार आहे. नडगावतर्फे बिरवाडी गणात वृषाली देशमुख,प्राची महाडीक यांनी अर्ज मागे घेतले. या गणात सेनेकडून रेणुका देशमुख, भाजपकडून चैत्राली दिघे अशी दुरंगी लढत होणार आहे. नाते गणात शिवसेनेकडून अनिल पवार यांनी अर्ज मागे घेतला. या गणात सुरेश महाडिक,उबाठाकडून कपिल देवळेकर, भाजपकडून सुरज किशोर जामदार, अपक्ष सुरेश महाडीक अशी चौरंगी लढत होणार आहे. दासगांव जि.प. गटात श्रावणी दवंडे यांनी अर्ज मागे घेतला.या गटात शिवसेनेकडून मन्सूर ताज, राष्ट्रवादीकडून अश्विनी घरटकर अशी दुरंगी लढत होणार आहे. दासगांव पं स गणात वैदेही सावंत यांनी अर्ज मागे घेतला. या गणात शिवसेनेकडून प्रेरणा सावंत, उबाठाकडून जितेंद्र बैकर अशी दुरंगी लढत होणार आहे. अ. तुडील गणात सहर इसाने यांनी अर्ज मागे घेतला. या गणात शिवसेनेकडून सबिहा पाचकर, राष्ट्रवादीकडून महरिन देशमुख, काँग्रेसकडून नाजनीन देशमुख अशी तिरंगी लढत होणार आहे. करंजाडी जि प गणात निकीता ताठरे,अ. रज्जाक करबेलकर,प्राजक्ता ओझर्डे,अनिल बेल यांनी अर्ज मागे घेतले. या गटात शिवसेनेकडून निलेश ताठरे, उबाठाकडून सोमनाथ ओझर्डे,काँग्रेसकडून उमेश तांबे, भाजपकडून अमित मोरे अशी चौरंगी लढत होणार आहे.

करंजाडी पं स गणात रमेश खिडबिडे,विलास राक्षे,स्नेहा मनवे यांनी अर्ज मागे घेतले. या गटात शिवसेनेकडून संदीप खिडबिडे,राष्ट्रवादीकडून सुमित तुपट अशी दुरंगी लढत होणार आहे. विन्हेरे पं स गणात सविता माने,अमृता जाधव यांनी अर्ज मागे घेतले. या गणात शिवसेनेकडून शकुंतला माने, राष्ट्रवादीकडून प्रमिला गायकवाड, उबाठाकडून सुषमा मोरे अशी तिरंगी लढत होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >