कर्जत : कर्जत तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ४७ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र वैध ठरली होती. त्यापैकी २८ उमेदवारांनी माघार घेतल्याने १९ उमेदवार रिंगणात आहेत. तर पंचायत समिती निवडणुकीसाठी ७४ उमेदवारांची नामनिर्देशन पत्र वैध ठरली होती त्यापैकी ४४ उमेदवारांनी माघार घेतल्याने ३० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काही ठिकाणी एकास एक उमेदवार निवडणूक लढावीत असून काही ठिकाणी तिरंगी, चौरंगी व पंचरंगी सामना रंगणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एकूण ७२ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने एकूण ४९ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्हा परिषदेच्या माणगाव तर्फ वरेडी गटात पंचरंगी, मोठे वेणगाव व पाथरज गटात तिरंगी आणि कळंब व नेरळ गटात दुरंगी लढत होणार आहे. तर पंचायत समितीच्या नेरळ गणात चौरंगी. कळंब, कशेळे, उकरूळ व दामत गणात तिरंगी तर पोशीर, पाथरज, माणगाव तर्फ वरेडी, वाकस, कडाव, मोठे वेणगाव व बीड बुद्रुक गणात एकास एक लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्जत तालुका
जिल्हा परिषद गट
कळंब.. २ पाथरज.. ३ माणगावतर्फे वरेडी..५ नेरळ..२ कडाव..४ मोठे वेणगाव..३
कर्जत पंचायत समिती अंतिम उमेदवार..
पोशीर..२ कळंब..३ पाथरज..२ कशेळे..३ माणगावतर्फे वरेडी..२ उकरूळ..३ नेरळ..४ दामत.. ३ वाकस..२ कडाव..२ मोठे वेणगाव..२ बीड बुद्रुक..२






