Sunday, January 25, 2026

साप्ताहिक राशिभविष्य, २५ ते ३१ जानेवारी २०२६

साप्ताहिक राशिभविष्य, २५ ते ३१ जानेवारी २०२६

साप्ताहिक राशिभविष्य, २५ ते ३१ जानेवारी २०२६

आरोग्य उत्तम राहील

मेष : आरोग्य उत्तम राहिल्यामुळे मानसिकता सुधारेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आपल्या समोरील कामे आपण उत्साहाने आणि वेगाने पूर्ण करू शकाल. जिद्द व चिकाटी वाढेल; परंतु कामांमध्ये अडथळे येण्याची शक्यता आहे. अति धाडस टाळा. पूर्ण विचार करून हातातील काम पूर्ण करा. आत्मविश्वासात वाढ होईल. इतरत्र बहुतेक सर्व क्षेत्रात मानसन्मान मिळेल. एखाद्या समारंभास उपस्थित राहाल. सहकुटुंब, सहपरिवार, मित्रमंडळींसहित एखाद्या धार्मिक पवित्र स्थळी भेट द्याल. व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. स्वतःवरील विश्वास कायम राहील. कुटुंबात किरकोळ कारणावरून वादावादी होऊ शकते.आरोग्याची काळजी घ्या. आपल्यामधील कलागुणांना वाव मिळेल. नोकरीत अनुकूलता लाभेल. कौटुंबिक सुख लाभेल.

कर्तृत्व सिद्ध करता येईल

वृषभ : कुटुंबातील प्रश्न सुटतील. इतरांच्या मताला प्राधान्य द्या. शांतपणे निर्णय घ्या. कार्यक्षेत्रात परिश्रमाला पर्याय नाही हे लक्षात ठेवा. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. स्थावरबाबतचे प्रश्न सुटतील. जमीन- जुमला विषयीचे थंडावलेले व्यवहार गतीमान होतील; परंतु वाद-विवाद टाळणे महत्त्वाचे ठरेल. व्यवसायातील परिस्थिती समाधानकारक राहील. कुटुंबातून पत्नीचे सहकार्य मिळेल. मित्रमंडळी, आप्तेष्ट, नातेवाईक भेटल्यामुळे आनंदात भर पडेल. कोणाशीही मतभेद टाळा. कोणत्याही लहान-मोठ्या आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगणे हिताचे ठरेल. जुन्या गुंतवणुका आर्थिक फायदा मिळवून देतील. नवीन गुंतवणुका होतील.

रागावर नियंत्रण ठेवा

मिथुन : कुटुंबात आपल्या कार्यस्थळी तसेच मित्रमंडळींच्या वर्तुळात रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. इतरांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेऊन त्यावरती आपली प्रतिक्रिया सावधपणे द्या. जोडीदाराशी वाद घालू नका. आरोग्य उत्तम राहील. मुलाच्या यशाचा आनंद साजरा कराल. आर्थिक आवक समाधानकारक राहील. व्यवसायात तसेच नोकरीत स्पर्धक बलवान होऊ शकतात. आपल्या कामाकडे लक्ष केंद्रित करा, तसेच नियम व शिस्त पाळणे हितकारक ठरेल. काहींना प्रवासाचे योग. राजकीय क्षेत्रातील जातकांनी आपल्या बोलण्यावर व वागण्यावर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक ठरेल.

आर्थिक आवक समाधानकारक

कर्क : व्यवसायात उलाढाल वाढून नफ्याच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येईल. व्यावसायिक स्थिती समाधानकारक राहील; परंतु कामगारांचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात, त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहा. सरकारी नियम व कायदे यांचे पालन अत्यावश्यक ठरेल. नोकरीत वाद-विवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकारण आणि गटबाजीपासून दूर राहा. वरिष्ठांची मर्जी सांभाळण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. भावंडांबरोबर संबंध चांगले राहतील. वडिलोपार्जित संपत्तीबद्दलचे वाद-विवाद संपुष्टात येतील.

भाग्याची साथ

सिंह : अनुकूल ग्रहमानामुळे भाग्याची चांगली साथ राहील. हाती घेतलेल्या कामात यश संपादित करू शकाल; परंतु कुटुंबात विशेषतः आपल्या जोडीदाराबरोबर वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकतात. लहान-सहान गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करा. व्यवसाय-धंद्यातील वाढ समाधान देऊन जाईल. नोकरीमध्ये आपल्या कामाची प्रशंसा होऊन आपण कौतुकास पात्र ठराल. पदोन्नतीची शक्यता, मात्र कामात बदल होऊ शकतो, तसेच स्थान बदलाची शक्यता. सामाजिक अथवा धार्मिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाहाच्या संबंधातील घडामोडी वेगवान होतील.

खर्चावर नियंत्रण ठेवा

कन्या : आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता. राहत्या घरासाठी खर्च कराल. भौतिक सुख व सुविधांची वाढ कराल. नवीन वाहन खरेदीचे योग, तसेच स्वतःच्या घरात जाण्याचे स्वप्न साकार होऊ शकते. त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास ते सफल होऊ शकतात. पैशाची सोय होईल. व्यवसायात गरज असेल, तर कर्ज मंजूर होऊ शकते. महत्त्वाची कामे करा. व्यावसायिक जुनी येणी वसूल होतील. व्यवसायात नवीन नियोजन करावे. नोकरी-व्यवसाय-धंद्यानिमित्त प्रवास करावा लागेल. प्रवास कार्यसिद्धी होईल.

धार्मिक व सामाजिक कार्यात सक्रिय योगदान

तूळ : धार्मिक तसेच सामाजिक कार्यात रस निर्माण होऊन अध्यात्मिकतेकडे कल राहील. धार्मिक तसेच सामाजिक कार्यात सक्रिय योगदान द्याल. कुटुंबात एखादा छोटा कार्यक्रम होऊ शकतो. मित्रमंडळी व नातेवाइकांचे आगमन घरात झाल्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. जीवनसाथीबरोबर वाद-विवाद टाळा. थोड्या नियमाने वागण्याची गरज. आर्थिक आवक समाधानकारक राहील. नोकरी तसेच व्यवसायात अस्थिर परिस्थिती निर्माण होऊ शकते. शांतपणे व पूर्ण विचारांती निर्णय घ्या. सुसंवादाने समस्या संपुष्टात येऊ शकतात.

वर्चस्व प्रस्थापित होईल

वृश्चिक : नोकरीत तसेच व्यवसाय-धंद्यात आपले निर्णय अचूक ठरल्यामुळे परिणामसुद्धा लाभकारक ठरतील. आपल्या मतास प्राधान्य मिळून कौतुकास पात्र ठराल. नोकरीमध्ये एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी निवड होऊन परदेशगमनाची शक्यता. आर्थिक आवक चांगली राहील. कुटुंबातील सदस्यांच्या वाढत्या मागण्या पूर्ण कराल, त्यासाठी मनसोक्त खर्च होऊ शकतो. चैनीच्या आणि महागड्या वस्तू खरेदीचा मोह आवडणार नाही, मात्र आरोग्याची काळजी घेणे हितकारक ठरेल. संसर्गजन्य बाधेपासून सावध राहा. शक्यतो प्रवास टाळलेले हिताचे ठरेल.

अनपेक्षित घटना घडतील

धनु : सदरील कालावधीमध्ये जरी अनपेक्षित घटना घडल्या तरी त्या अनुकूल स्वरूपाच्या असतील. नोकरीत अनुकूलता वाढेल. अपेक्षेपेक्षा जास्त चांगल्या बाबी घडलेल्या निदर्शनास येतील. कुटुंबातील मुला-मुलींना चांगले यश मिळेल. प्रगतीच्या दृष्टीने वाटचाल चालली असलेली दिसेल. आपल्या रोजच्या कामकाजात इतरांची मदत मिळू शकते. व्यवसाय-धंदा, नोकरी इत्यादींमध्ये भाग्यकारक घटना घडतील. जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. कुटुंबातील वातावरण उत्साही आणि आनंदी राहील. प्रवासाचे योग. विवाहयोग्य तरुण-तरुणींचे विवाहाच्या संबंधातील घडामोडी वेगवान होतील.

नोकरीत प्रगती

मकर : व्यवसाय-धंदा, नोकरी यामध्ये आपल्या रोजच्या कामाच्या व्यतिरिक्त नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. अर्थातच त्या एक आव्हान म्हणून स्वीकारा. सकारात्मक दृष्टिकोन फायदेशीर ठरेल. नोकरीत प्रगतीबरोबरच बदलीची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या वाढतील. कार्यक्षेत्र विस्तार होईल. सरकारी क्षेत्रात कार्य करणाऱ्यांच्या अधिकारातही वाढ होईल; परंतु आपल्या अधिकार कक्षेतच कार्य करा. व्यवसायात तसेच नोकरीत स्पर्धक बलवान होऊ शकतात. तसेच लहान-मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. कुटुंबात किरकोळ कारणावरून वादावादी होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या. या भावंडांची विचारपूस करा.

आर्थिक व्यवहारात दक्षता

कुंभ : व्यवसाय-धंद्यात अंदाज चुकण्याची शक्यता आहे. लहान-मोठे आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगा. इतरांवर जास्त भरोसा ठेवण्यात नुकसान होऊ शकते. नवीन गुंतवणूक करताना त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींचा सल्ला मोलाचा ठरेल. नोकरीत अनुकूलता वाढेल. जोडीदाराची साथ राहील. आर्थिक आवक समाधानकारक राहील. नोकरी अधिकारात वाढ होईल, पण राजकारण आणि गटबाजीपासून अलिप्त राहा. काहींना प्रवासाच्या योगाची शक्यता जाणवते. विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करणे फायदेशीर राहील. कुसंगती टाळा. धार्मिक कार्यात पुढाकार घ्याल. नातेवाईक-आप्तेष्ट यांचे संबंध सुधारतील. महत्त्वाची कामे करा.

महत्त्वाचे व्यवहार होतील

मीन : जमीनजुमला, स्थावर याविषयीचे व्यवहार जे थांबलेले होते ते गतिमान होऊन पूर्णत्वाच्या मार्गावर राहतील. वडिलोपार्जित संपत्ती, स्थावर मिळकत याबाबतचे वाद-विवाद संपुष्टात येतील. आर्थिक परिस्थिती चांगली होईल. नवीन वाहन खरेदीचे योग. कोणत्याही व्यवहाराबाबतच्या कागदपत्रांवर काळजीपूर्वक वाचून सही करा. घाईगर्दीतील निर्णय नुकसानीस आमंत्रण देऊ शकतात. काहींना प्रवासाचे योग. कुटुंबातील वातावरण चांगले राहून जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील. प्रवास घडते; परंतु प्रवासात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे राहील.
Comments
Add Comment