ठाण्यात १२ दिवस टप्प्याटप्प्याने पाणीकपात

विविध भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार


ठाणे : ठाणे महानगरपालिका व बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील भातसा नदीवरील बंधाऱ्यावर बसवण्यात आलेल्या न्युटिक गेट सिस्टीमच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम २७ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत होणार असल्याने नदीतील पाण्याची पातळी कमी करण्यात आली आहे. परिणामी पिसे येथील उदंचन केंद्रातील पाण्याची पातळी घटली असून, ठाणे महापालिकेला मिळणारा पाणीपुरवठा सुमारे २० टक्क्यांनी कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठामपाने शहरात पुढील १२ दिवस टप्प्याटप्प्याने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला असून, विविध विभागांमध्ये २४ तासांचे पाणी शटडाऊन घेण्यात येणार आहे. काही भागांत कमी दाबाने तर काही भागांत पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे.


२८ जानेवारी ते ७ फेब्रुवारीपर्यंत रोज वेगवेगळ्या प्रभागांमध्ये सकाळी ९ ते पुढील दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. वागळे, वर्तकनगर, कळवा, मुंब्रा, कोपरी, राबोडी, माजीवाडा, मानपाडा, ढोकाळी, कासारवडवली आदी प्रमुख भागांचा समावेश आहे. दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पाणीसाठा करून ठेवावा, पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Rinku Rajguru : रिंकू राजगुरुनं दिली प्रेमाची कबुली, तुझ्या प्रेमात वेडी झालीये म्हणत केली 'ही' पोस्ट

मुंबई : महाराष्ट्राची आर्ची म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री रिंकू राजगूरू ही सोशल मिडियावर सक्रिय असून

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

'या' प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला झाला ब्रेस्ट कॅन्सर, सोशल मिडियावर भावूक पोस्ट शेअर करत दिली माहिती

मुंबई : मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे सेक्रेड गेम्स,मँटो आणि ब्लॅक वॉरंट यांसारख्या

शरीर सुखाच्या मागणीला नकार देताच अभिनेत्यानं केली हत्या, मिरारोडमध्ये घडला धक्कादायक प्रकार

मुंबई : मुंबईतील मीरा रोड परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका अभिनेत्याने आपल्याच घरात काम करणाऱ्या

प्रसिद्ध मॉडेलसोबत लाइव्ह शोमध्ये घडला 'हा' धक्कादायक प्रकार, सोशल मिडियावर व्हिडिओ व्हायरल

आपण सोशल मिडिया वापरत असताना आपल्याला यावर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही या सोशल मिडियावर बऱ्याचदा

Bigg Boss Marathi 6 : बिग बॉसच्या घरातील 'हा' सदस्य बाहेर जाणार ?

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन सध्या दोरदार चर्चेत आहे. बिग बॉस मराठीला ७० दिवस झाले आहेत. तर, आता शेवटचे ३० दिवस