Sunday, January 25, 2026

तेजस्वी यादव आरजेडीचे कार्यकारी अध्यक्ष

तेजस्वी यादव आरजेडीचे कार्यकारी अध्यक्ष

पाटणा: पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राष्ट्रीय जनता दलाने मोठा निर्णय घेतला असून तेजस्वी यादव यांची पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा निर्णय तेजस्वी यादव यांच्यासाठी मोठे यश मानले जात असतानाच, दुसरीकडे त्यांच्या बहिणी रोहिणी आचार्य यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावरून त्यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. रोहिणी आचार्य यांनी या नियुक्तीला “कठपुतळी बनलेल्या शहजाद्याचा राज्याभिषेक” असे संबोधत निशाणा साधला आहे. आरजेडीची ही राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक येथील हॉटेल मौर्या येथे पार पडली. बैठकीला राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, सर्व राज्यांतील प्रदेशाध्यक्ष, खासदार तसेच विधानसभा आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते. अनेक राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि कार्यकारिणी सदस्य एक दिवस आधीच पटण्यात दाखल झाले होते. तेजस्वी यादव यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयावर पक्षप्रमुख आणि राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीने अंतिम शिक्कामोर्तब केले. या बैठकीत लालू यादव, राबडी देवी, तेजस्वी यादव आणि मीसा भारती उपस्थित होते.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >