Sunday, January 25, 2026

मुरुड-जंजिरा नगरपालिका विषय समित्या निवडी बिनविरोध

मुरुड-जंजिरा नगरपालिका  विषय समित्या निवडी बिनविरोध

शिवसेना शिंदे गटाचे ५ समित्यांवर वर्चस्व

नांदगाव मुरुड : मुरुड नगरपालिकेच्या विविध विषयांच्या विषय समित्यांच्या निवडीसाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत सर्व समित्यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या त्यातील सर्व पाचही समित्यांवर शिवसेना शिंदे गटाने आपले वर्चस्व सिद्ध केले. शुक्रवारी झालेल्या सभेत पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी सदस्यांचे स्वागत केले. समित्या कीती असाव्यात यावर केलेल्या चर्चेत विरोधकांकडून शिंदे शिवसेना पक्षांचे गटनेता पांडुरंग आरेकर यांनी सांगितले, की अध्यक्ष पकडून सहा समिती असाव्यात तर सत्ताधारी यांच्याकडून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक तमीम ढाकम यांनी ४ समित्या असाव्यात यावर पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी निवडणूक घ्यायची आहे का असे विचाले सत्ताधारी यांच्याकडे संख्या बळ नसल्याने निवडणूक न घेता विरोधकांकडून सुचविलेला प्रस्ताव मान्य करुन अध्यक्ष पकडून पाच समित्या घेण्याचे ठरविले.

त्यानंतर पाच विषय समित्यांवर चार सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित अजित पवार गटाच्या नगराध्यक्षा आराधना दांडेकर ह्या स्थायी समितीच्या अध्यक्षा असणार, तर शिवसेनेचे उपनगराध्यक्ष विरेंद्र भगत यांच्याकडे आरोग्य व शिक्षण समिती सभापती सदस्य अंकिता गुरव, ॲड. रूपेश पाटील, आदेश दांडेकर, तमिम ढाकम यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बांधकाम व दिवाबत्ती समिती सभापती यास्मिन कादिरी, तर सदस्य म्हणून ॲड. रूपेश पाटील, नितिन आंबुर्ले, आदेश हरिश्चंद्र दांडेकर, मनोज भगत, यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पाणीपुरवठा व मलनि:सारण समिती सभापती पांडुरंग आरेकर तर सदस्य मनिष विरकुड, विजय पाटील, रुपेश पाटील, प्रीता चौलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

नियोजन व पर्यटन विकास समिती सभापती रूपेश रणदिवे, तर सदस्य वैदेही आरेकर, श्रीकांत खोत, श्रध्दा अपराध, प्रमिला माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समिती सभापती नगमाना इम्तियाज उप सभापती सुगंधा मकू, तर सदस्य अंकिता गुरव, देवायानी गुरव, प्रांजली मकू यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी जाहीर केले. या पाचही समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व दिसून आले.

Comments
Add Comment