जीवनशिक्षण

जीवनगंध,पूनम राणे

विवारचा दिवस होता. खूप दिवस घराची साफसफाई करणे बाकी होते. आईने आदल्या दिवशी सर्वांना बजावून सांगितले होते की, उद्या सर्वांनी लवकर उठायचे.कारण उद्या आपल्याला घराची साफसफाई करायचे आहे. कोळ्यांची जळमटे, नको असणारे सामान, जमा झालेल्या दोन महिन्याच्या पेपरची रद्दी या साऱ्या वस्तू रद्दीत द्यायच्या आहेत. ठरल्याप्रमाणे सर्वजण सकाळी लवकर उठले. मात्र अविनाश आणि सोहम उठायचा कंटाळा करू लागले. आई त्यांना उठवायचा प्रयत्न करत होती. पण ते म्हणत होते. ‘झोपू दे ना, गं आई... आठवड्यातून एक तर आम्ही ८ वाजेपर्यंत झोपतो. नाही तर रोज सकाळी लवकर उठून शाळेत जावं लागतं.’ या कुशीवरून त्या कुशीवर वळत आढेवेढे घेत आईच्या सततच्या हाकेने एकदाचे ते दोघे उठलेच. ब्रश करून आणि फ्रेश होऊन सर्वांनी चहा-नाश्ता केला. कपाटातील एक एक खण स्वच्छ करायला सुरुवात केली. गरजेपोटी परंतु आता उपयोगी नसलेल्या कितीतरी वस्तू घरामध्ये होत्या. स्नेहाने सर्व वस्तू ज्या आपल्यासाठी नको आहेत, त्या घरात येणाऱ्या कामवाल्या बाईला देण्यासाठी वेगळ्या पिशवीत जमा करून ठेवल्या. त्यामध्ये सोहमला नको असणारी रंग पेटी, कंपास पेन्सिल, खोडरबर अशा कितीतरी वस्तू ड्रॉवरमध्ये होत्या.


अविनाशला वाढदिवसाच्या निमित्ताने आणलेली सायकलही चाक तुटल्यामुळे माळ्यावर रद्दीत पडलेली होती. ती सुद्धा खाली काढण्यात आली. अविनाशला सायकल पाहून आपल्या वाढदिवसाची आठवण झाली. किती आनंदात आणि मजेत आपण वाढदिवस साजरा केला होता. हीच सायकल ज्यावेळी नवीन होती त्यावेळेस मी माझ्या मित्रांना आनंदाने दाखवत होतो. पण आता तुटल्यामुळे ती अडगळीत पडलेली होती. आई आपण हिला दुरुस्त करून घेऊ, असे वारंवार आईला तो विनवणी करत होता; परंतु आता खूप वर्ष झाल्याने सायकलला गंज चढला होता. गंजली आहे तिचा काही उपयोग नाही असे म्हणून आईने त्याची समजूत काढली.



जवळजवळ दोन-चार तास साफसफाई चालू होती. दुपारचे १२ वाजत आले होते. दुपारी आपल्याला जेवण करायचे आहे. म्हणून आईने सोहमला बाजारात जायला सांगितले. बाजारातून टोमॅटो, नारळ, कोथिंबीर, कांदे बटाटे इत्यादी वस्तू आणायला सांगितल्या.
सोहम पिशवी घेऊन बाजारात गेला. त्याने सर्व वस्तू खरेदी केल्या. आज बाजार गच्च भरलेला होता. कारण रविवारचा दिवस होता. आज महिलांपेक्षा पुरुष माणसांची गर्दी जास्त दिसत होती. सोहमने टोमॅटो, नारळ, कांदे, बटाटे, कढीपत्ता, कोथिंबीर या साऱ्या वस्तू घेतल्या.
आईकडे पिशवी दिली आणि सोहम खेळायला अंगणात गेला. आईने काम आवरल्यानंतर पिशवी उघडली. एक एक करून वस्तू बाहेर काढल्या. पाहते तर काय... टोमॅटो पूर्णतः चिरडून गेले होते. पिशवी ओली झाली होती. कारण सोहमने भाजी घेताना सर्वप्रथम टोमॅटो घेतले होते. त्यानंतर त्याने नारळ, कांदे, बटाटे घेतले. त्यामुळे जड वस्तूमुळे टोमॅटो चिरडून गेले होते.


आईने टोमॅटो ओट्यावर ठेवले होते. सोहम दोन तासांतच खेळून परत आला हातपाय धुवून तो पाणी पिण्यासाठी स्वयंपाक घराकडे वळला. त्याची नजर टोमॅटोकडे गेली तो म्हणाला,” आई हे काय,” टोमॅटो चिरडले कसे?” टोमॅटो दबले कसे?” आई म्हणाली,” अरे सोहम, तुला मी बाजारात भाजी आणण्यासाठी पाठवलं. तू काय केलंस!” सुरुवातीला टोमॅटो घेतलेस आणि त्यावर भला मोठा नारळ ठेवलास आणि त्यावर कांदे-बटाटे त्यामुळे अक्षरशः टोमॅटोचं पाणी पाणी झालं. खरं तर जड आणि कठीण वस्तू सर्वप्रथम घेऊन त्या पिशवीच्या तळाशी ठेवायला हव्या होत्या आणि टोमॅटो सर्वात वरती ठेवायला हवे होते.
सोहम,आपण जे शाळेत शिक्षण घेतो ते अनुभवाने संपन्न करायचे असते. ठीक आहे एकदा चुकलास. पुढे तुझ्या हातून अशी चूक होणार नाही. खरे तर अशा छोट्या-छोट्या कामांची सवय आम्ही पालकांनीच मुलांना लावायला हवी. त्यामुळे
प्रत्यक्ष कृतीतून मुलांचे अनुभव विश्व अनुभव संपन्न होईल.”
“खरंच आई ,इतकी छोटी गोष्ट माझ्याही लक्षात आली नाही. यापुढे असे कधीही होणार नाही. “सोहम म्हणाला.
तात्पर्य :- पुस्तकी ज्ञानापेक्षा अनुभवाचे ज्ञान सर्वात महत्त्वाचे असते.

Comments
Add Comment

प्रेम म्हणजे ऑक्सिजन

मनस्विनी,पूर्णिमा शिंदे प्रेम हे आपल्या संस्कृतीचं पवित्र मूल्य. शब्दांना प्रेमाचा ओलावा लागला की जीवनालाच एक

तिमिरातून तेजाकडे...

अंधार कोणाच्या आयुष्यात नाही असं होतं का? कधी बाहेरचा, तर कधी आतला, पण प्रत्येक माणूस कोणत्या ना कोणत्या

मदालसा

महाभारतातील मोतीकण,भालचंद्र ठोंबरे आपली मुले जन्म-मरणाच्या चक्रामध्ये न गुरफटता त्यांना मुक्ती मिळावी या

माझा आयुष्यातील पहिला ट्रेक : ‘हरिश्चंद्रगड’

संवाद,गुरुनाथ तेंडुलकर डोंबिवलीचे ट्रेकर विजय वाठारे (आनंद यात्रा पर्यटन) यांनी तीन दिवसांची हरिश्चंद्रगड

छोडो कलकी बातें...

र्वी एकंदर समाजाच्या मानसिकतेचा विचार करून सिनेमाचे कथानक आणि गाणीही लिहिली जात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बरीच

माझी आणि भारुडाची ओळख अशी झाली...

स्मृतिगंध,लता गुठे महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो, ज्या हजारो वर्षांपासून