Sunday, January 25, 2026

शिरगाव जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार मोहिमेचा धडक्यात शुभारंभ

शिरगाव जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार मोहिमेचा धडक्यात शुभारंभ

कार्यकर्त्यांचा एकजुटीने मोठ्या विजयाचा निर्धार

शिरगांव : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, देवगड तालुक्यातील शिरगाव जिल्हा परिषद गटात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार मोहिमेचा शुभारंभ धडक्यात करण्यात आला. शिरगावची ग्रामदेवता श्री देवी पावणाई देवालयात श्रीफळ वाढवून आणि गाऱ्हाणे घालून या मोहिमेची अधिकृत सुरुवात झाली. या प्रसंगी महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने मोठ्या विजयाचा निर्धार व्यक्त केला.

या निवडणुकीत शिरगाव जिल्हा परिषद गटातून देवदत्त दामोदर कदम, शिरगाव पंचायत समिती गणातून शितल सुरेश तावडे आणि तळवडे पंचायत समिती गणातून सलोनी संतोष तळवडेकर हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. आपल्या लाडक्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आता कंबर कसली आहे.

प्रचार शुभारंभ प्रसंगी भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम, मिलिंद साटम, अमित साटम, सुभाष नार्वेकर, दाजी राणे, राजू शेट्ये, मंगेश लोके, शैलेंद्र जाधव, नाना तावडे, सुनील कांडर, सुभाष थोरबोले, सत्यवान कदम, रवींद्र पवार, परशुराम पवार, देवेंद्र पवार, अरविंद पवार, अजित परब, वैभव भाटकर, रोहन तावडे, केतन धुळप, बंडू माने, महेश मेस्त्री, वसंत साटम, उल्हास परब, विश्वनाथ परब, रत्नदीप कुवळेकर, अमित घाडी, पंकज दुखडे, महेश पवार, ओमकार तावडे, गोपीनाथ तावडे, युधी राणे, प्रसाद तावडे, सचिन तळवडेकर, किशोर तळवडेकर, अपूर्वा तावडे, दीप्ती तावडे, प्रल्हाद तावडे, भिकाजी राणे, सुनील गावडे, श्वेता शिवलकर, सुनील वळंजू, सुदर्शन साळकर, ऋषिकेश कांडर यांच्यासह शिरगाव जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Add Comment