लाल किल्ल्याच्या प्रांगणात रंगणार ‘भारत पर्व २०२६’

चित्ररथाचे विशेष आकर्षण


नवी दिल्ली : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाद्वारे २६ ते ३१ जानेवारी या कालावधीत लाल किल्ल्यावर 'भारत पर्व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी विनामूल्य प्रवेश असून, २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते रात्री ९ आणि २७ ते ३१ जानेवारी या काळात दुपारी १२ ते रात्री ९ या वेळेत सुरू राहील. या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (MTDC) भव्य दालन असून, याद्वारे महाराष्ट्राच्या समृद्ध पर्यटनाचे आणि ऐतिहासिक वारशाची माहिती देण्यात येणार आहे.


या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य संचलनात सहभागी झालेला महाराष्ट्राचा 'गणेशोत्सव: आत्मनिर्भर भारताचे प्रतीक' हा देखणा चित्ररथ. हा चित्ररथ प्रदर्शनासाठी लाल किल्ला परिसरात विशेष स्थानी ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्राचा लाडका उत्सव असलेला 'गणेशोत्सव' हा केवळ धार्मिक सोहळा नसून तो स्थानिक कलाकारांना, मूर्तिकारांना आणि लघुउद्योगांना कशाप्रकारे बळ देतो, म्हणजेच 'आत्मनिर्भर भारताचे' एक जिवंत प्रतीक कसे आहे, याची प्रभावी मांडणी या चित्ररथातून करण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (MTDC) या दालनामध्ये पर्यटकांना राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळे, अथांग कोकण किनारपट्टी, ऐतिहासिक गड-किल्ले, अध्यात्मिक वारसा आणि व्याघ्र प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. राज्यातील विविध पर्यटन केंद्रांवरील निवासाच्या सोयी आणि वैशिष्ट्यपूर्ण पर्यटन पॅकेजेसची माहिती देण्यासाठी येथे स्वतंत्र कक्ष कार्यरत असेल. या महोत्सवात पर्यटकांना 'पॅन इंडिया फूड कोर्ट'च्या माध्यमातून विविध राज्यातील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येईल. यासोबतच हस्तशिल्प आणि हातमाग बाजारात विणकरांनी तयार केलेल्या विविध कलाकुसरीच्या वस्तू उपलब्ध असणार आहेत. सहा दिवसांच्या या उपक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम, सशस्त्र दलांचे बँड वादन आणि 'डिजिटल इंडिया'चे प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमांची रेलचेल असेल.

Comments
Add Comment

Gujrat News : रात्री डोसा खाल्ला अन् होत्याच नव्हतं झालं...हसतेखेळते कुटुंब उद्ध्वस्त!

अहमदाबाद : गुजरातच्या अहमदाबादमधील चांदखेडा परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका कुटुंबाने

Vapi Chemical Units : वापी औद्योगिक वसाहतीला युद्धाचा विळखा! कच्चे तेल आणि कच्च्या मालाचे दर भडकल्याने उत्पादन कोलमडले

वापी : पश्चिम आशियात (इराण-अमेरिका-इस्रायल) भडकलेल्या युद्धाच्या ज्वाला केवळ त्या भूप्रदेशापुरत्या मर्यादित न

Shreyansh Patel : बुद्धीबळाच्या पटावर अडीच वर्षांच्या चिमुरड्याची 'शह-मात'! श्रेयांश पटेलने रचला विश्वविक्रम

हैदराबाद : बुद्धीबळ म्हणजे संयम आणि तल्लख बुद्धिमत्तेचा खेळ. जिथे मोठ्यांनाही विचार करावा लागतो, तिथे एका अवघ्या

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक