Sunday, January 25, 2026

राजकीय पक्षांची बॅनरबाजी, पालिकेची डोकेदुखी

राजकीय पक्षांची बॅनरबाजी, पालिकेची डोकेदुखी

वाहतुकीच्या कोंडीत भर, अपघाताची भीती

मुंबई : महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आणि कांदिवलीतील सर्व परिसर बॅनरमुक्त झाला. मार्ग, चौक, नाके, सिग्नल चौक, दुभाजक, सुशोभीकरण केलेले चौक आणि स्काय वॉक आदींनी मोकळा श्वास घेतला होता. निकाल जाहीर झाला आणि राजकीय पक्षांचे विजयाचे तसेच पराजयाचे आभार व्यक्त केल्याचे बॅनर सर्वच परिसरात, नाके चौकात झळकळे राजकीय पक्षांनी बॅनर बाजी करून परिसर विद्रुप केला. पालिकेने बॅनर बाजीवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून तसेच पर्यावरण प्रेमीकडून केली जात आहे.

मुंबई सुशोभीकरण प्रकल्पाला पालिकेने करोडो रुपये खर्च करून, चौक नाके आणि सिग्नल चौकांचे सुशोभीकरण केले. मात्र राजकीय पक्ष, मंडळे, संस्था आणि स्वयंम घोषित कार्यकर्ते यांच्या बॅनरबाजीमुळे कांदिवली विभागातील उद्यान, चौक, नाके, सिग्नल, पर्जन्य वृक्ष, पालिका शाळा, दुभाजक आणि स्काय वॉक परिसर विद्रुप होतात. पालिकेचे एक वाहन घेऊन कर्मचारी दिवसाला दोन तीन विभागात कारवाई करत लावलेले बॅनर काढतात. अशा प्रकारे विभागा विभागात जाऊन बॅनरवर कारवाई करतात. दुसऱ्या दिवशी बॅनरबाजी केली जाते. थोडक्यात तक्रारी नंतर पालिका कारवाई करते आणि बहुतांशी राजकीय पक्षांचे खासदार, आमदार वा नगरसेवक पुन्हा बॅनरबाजी करतात. मार्गातील दुभाजक व विजेच्या खांबावर लावण्यात येणारे बॅनर बहुतांशी फाटतात, लटकतात, परिणामी अपघात होतात. २२ जानेवारीपासून माघी गणेशोत्सव सुरु झाला आहे. मंडळाचे देणगीदार म्हणजे विकासक आणि सोन्या-चांदीच्या वापऱ्यांकडून प्रवेशद्वार, कमान, मुख्य चौकात आणि मार्गात लावण्यात येतात, आधीच वाहतुकीची कोंडी होत असलेल्या मार्गांवर, कोंडीत भर पडते.

आर/दक्षिण वरिष्ठ निरीक्षक राजेशकुमार सिंग यांच्याशी तीन चार वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र प्रतिसाद मिळाला नाही. सामाजिक कार्यकर्ते यतीन भिंगार्डे न्यायालयाने पालिकेवर बॅनर बाजीच्या कारवाई संदर्भात ताशोरे ओढले असून देखील यावर योग्य, कडक आणि निर्णायक तोडगा काढला नाही. नियम अंमलात आलेले नाही. यगमुळे बॅनर बाजीचे, परिसर विदरूपीकरण चक्र असेच सुरु राहाणार.

Comments
Add Comment